कॅटरिना कैफचा इन्स्टाग्राम डेब्यू ठरला दीपिका पादुकोणच्या नाराजीचे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 14:56 IST2017-04-30T09:26:07+5:302017-04-30T14:56:07+5:30
गत आठवड्यात कॅटरिना कैफने इन्स्टाग्राम डेब्यू केला. कॅटरिनाच्या या इन्स्टाग्राम डेब्यूची प्रचंड चर्चा झाली. सगळ्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या. ...
.jpg)
कॅटरिना कैफचा इन्स्टाग्राम डेब्यू ठरला दीपिका पादुकोणच्या नाराजीचे कारण?
ग आठवड्यात कॅटरिना कैफने इन्स्टाग्राम डेब्यू केला. कॅटरिनाच्या या इन्स्टाग्राम डेब्यूची प्रचंड चर्चा झाली. सगळ्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या. एकंदर काय तर कॅटरिना भाव खावून गेली. पण कदाचित यामुळे दीपिका पादुकोणचा भाव घसरला. होय, केवळ कॅटरिनाच्या इन्स्टाग्राम डेब्यूमुळे ‘राबता’मधील तिच्या हॉट आयटम नंबरला सोशल मीडियावर पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. कॅटरिनाच्या इन्स्टाग्राम डेब्यूमुळे दीपिकाचे आयटम नंबर झाकोळले गेले. आता हे आम्ही नाही तर दीपिकाची टीम म्हणतेय. सूत्रांचे मानाल तर, दीपिका व तिची टीम यामुळे नाराज आहे. दीपिकाचे आयटम नंबर दणक्यात रिलीज झाले आणि कॅटरिनाने नेमक्या याचवेळी इन्स्टाग्रामवर एन्ट्री घेतली, असे दीपिकाच्या टीमचे म्हणणे आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, कॅटने दीपिकाची आयती प्रसिद्धी कॅश केली, असे टीमला म्हणायचे आहे. आयत्या पिठावर रेघोट्या, असे आपण आणखी सोपे करून म्हणू शकतो. दीपिकाच्या टीमच्या मते, कॅटरिनामुळे दीपिकाच्या आयटम नंबरला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दीपिका कॅटरिनावर नाराज आहे. विशेष म्हणजे,दीपिकाचा बॉयफ्रेन्ड रणवीर सिंह याने या नाराजीत आणखी भर घातली आहे. दीपिकाची साथ द्यायचे सोडून तो कॅटरिनाचे इन्स्टाग्रामवर वेलकम करण्यात गुंतला आहे.
ALSO READ : रणवीर सिंगने कॅटरिना कैफचे केले इन्स्टाग्रामवर वेलकम!
आता यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण दीपिका व कॅटरिनाचे जराही पटत नाही, हे मात्र आम्हाला ठाऊक आहे. दीपिकाला सोडून रणबीर कपूर कॅटरिनाकडे गेला, तेव्हापासून दोघींमध्ये जराही पटत नाही. आता दीपिकाच्या या नाराजीवर कॅटरिना कशी रिअॅक्ट होते, ते पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे.