Pathaan Box office: 500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:19 PM2023-02-16T12:19:33+5:302023-02-16T12:20:55+5:30

25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठानने केवळ 21 दिवसांत 498.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर 22व्या दिवशी 500 कोटींच्या क्लब मध्ये सामील झाला.

deepika padukone shah rukh khan movie Pathaan became the first Bollywood film to collect 500 crores on Box office | Pathaan Box office: 500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार 

Pathaan Box office: 500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार 

googlenewsNext

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट "पठान" 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटात शाहरुख सोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत नव नवे विक्रम करताना दिसत आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठानने केवळ 21 दिवसांत 498.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर 22व्या दिवशी 500 कोटींच्या क्लब मध्ये सामील झाला.

किती झाले पठानचे कलेक्शन -
शाहरुख खानच्या पठानने केवळ 21 दिवसांतच 498.85 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तसेच, Sacnilk च्या अर्ली ट्रेंड्सनुसार, या चित्रपटाने 22व्या दिवशी जवळपास 4 कोटींचे कलेक्शन केले. यानुसार हा चित्रपट आता 500 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 500 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. यातच आता, पठानची टक्कर बाहुबली 2 सोबत आहे. ज्याचे कलेक्शन 511 कोटी रुपये एवढे आहे.

पहिला दिवस: 57 कोटी रुपये
दुसरा दिवस: 70.50 कोटी रुपये
तिसरा दिवस: 39.25 कोटी रुपये
चौथा दिवस: 53.25 कोटी रुपये
पाचवा दिवस: 60.75 कोटी रुपये
6वा दिवस: 26.50  कोटी रुपये
7वा दिवस: 21 कोटी रुपये
8वा दिवस: 18.25 कोटी रुपये
9वा दिवस: 15.65 कोटी रुपये
10वा दिवस: 14 कोटी रुपये
11वा दिवस: 23.25 कोटी रुपये
12वा दिवस: 28.50 कोटी रुपये
13वा दिवस: 8.55 कोटी रुपये
14वा दिवस: 7.75 कोटी रुपये
15वा दिवस: 6.75 कोटी रुपये
16वा दिवस: 5.95 कोटी रुपये
17वा दिवस: 5.90 कोटी रुपये  
18वा दिवस: 11.25 कोटी रुपये  
19वा दिवस: 13 कोटी रुपये
20वा दिवस: 4.20 कोटी रुपये
21वा दिवस: 5.61 कोटी रुपये 
22वा दिवस: 4 कोटी रुपये (अर्ली ट्रेंड)

शाहरुखचे प्रोजेक्ट्स -
शाहरुख खानच्या पठानने धमाका केला आहे. पठाननंतर आता शाहरुख खान, 'डंकी' आणि 'जवान' मध्येही दिसणार आहे. राजकुमार हिरानीचा चित्रपट डंकीमध्ये शाहरुख खानची जोडी तापसी पन्नू सोबत असेल. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. या दोन्ही चित्रपटांशिवाय, शाहरुख, दग्दर्शक अॅटलीसोबतही जवान या चित्रपटात दिसेल. यातील शाहरुखचा लुक नुकताच लिक झाला असून तो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. शाहरुखचा जवान, 2 जून 2023 रोजी हिंदीबरोबरच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: deepika padukone shah rukh khan movie Pathaan became the first Bollywood film to collect 500 crores on Box office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.