खाली डोकं वर पाय असलेल्या 'या' अभिनेत्रीचा फोटो होतो व्हायरल,'ही' अभिनेत्री कोण ओळखा पाहू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:53 IST2018-07-12T15:27:33+5:302018-07-12T15:53:44+5:30
या फोटोला सोशल मीडियावर खुप पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत असून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.

खाली डोकं वर पाय असलेल्या 'या' अभिनेत्रीचा फोटो होतो व्हायरल,'ही' अभिनेत्री कोण ओळखा पाहू?
सुंदर दिसणं आणि उत्तम आरोग्य असणं कोणाला बरं नाही आवडणार....सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक कलाकार फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो. हिंदी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे प्रचंड फिटनेसफ्रिक असतात. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. सा-यांची फेव्हरेट आणि सौंदर्याची मलिका दीपिका पादुकोणचा हा फोटो आहे. ऑनस्क्रीन दीपिकाने ग्लॅमरस आणि बोल्ड अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केलेलंच आहे... मात्र आता तिचा हा रफ एंड टफ अंदाज पहा....फिट राहण्यासाठी न चुकता योगा आणि वर्कआऊट करताना दिसते.या फोटोच्या माध्यमातून दीपिकाने तिचा फिटनेस फंडा उलगडला असून जगण्याचा आनंद घेण्याचाही सल्लाही दीपिकाने यावेळी दिला.तसेच दीपिकाच्या या फोटोला सोशल मीडियावर खुप पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत असून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळेच उत्तम आरोग्य ठेवण्यासाठीचं दीपिकाने हा कानमंत्रच दिला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
बॉलिवूडचे हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या बी टाऊनमध्ये सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे लव्हबर्ड या वर्षाच्या अखेरिस लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. अनुष्का आणि विराटनंतर हे कपल सुद्धा इटलीमध्ये लग्न करणार आहेत. दीपिका आणि रणवीर स्वित्झर्लंडमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. रणवीर स्विझ टुरिझमचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर असल्यानं या दोघांचं लग्न स्वित्झर्लंडमध्ये होणार असल्याची चर्चा होती मात्र आता हे दोघे इटलीमध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळतेय. ऐवढेच नाही तर दोघांच्या घरी लग्नाची शॉपिंगसुद्धा सुरू झाली आहे. या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये रणवीर आणि दीपिकांच्या कुटुंबीयांसोबत इंडस्ट्रीमधील काही जवळचे मित्र-मौत्रिणीसुद्धा उपस्थित राहणार आहेत.