दीपिका पादुकोणने स्मोकी लूकमध्ये केले फोटोशूट, पहा तिच्या घायाळ करणाºया अदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 11:17 AM2017-11-17T11:17:56+5:302017-11-17T16:47:56+5:30

सध्या प्रचंड वादाच्या भोवºयात आणि चर्चेत असलेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे लेटेस्ट फोटोशूट नुकतेच समोर आले आहे. या फोटोमध्ये ...

Deepika Padukone made photoshoot in a smoky look, see her wounded! | दीपिका पादुकोणने स्मोकी लूकमध्ये केले फोटोशूट, पहा तिच्या घायाळ करणाºया अदा!

दीपिका पादुकोणने स्मोकी लूकमध्ये केले फोटोशूट, पहा तिच्या घायाळ करणाºया अदा!

googlenewsNext
्या प्रचंड वादाच्या भोवºयात आणि चर्चेत असलेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे लेटेस्ट फोटोशूट नुकतेच समोर आले आहे. या फोटोमध्ये दीपिका स्मोकी लूकमध्ये बघावयास मिळत असून, तिचे हे फोटो सोशल मीडियावर अक्षरश: धूम करीत आहेत. दीपिकाने हे फोटोशूट डिफरेंट आउफफिट्समध्ये केले आहे. दीपिकाचे हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यातील काही फोटोज् तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दीपिकाने लॉन्ग बूट घातले आहेत. त्यामुळे ती खूपच हॉट दिसत आहे. एका फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला आहे. तर एका फोटोमध्ये तिने स्कीन कलरचा टॉप आणि ब्लू जीन्स घातलेली आहे. सोफ्यावर बसलेल्या या फोटोमध्ये दीपिका खूपच हॉट दिसत आहे. 







दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले असून, हा चित्रपट एक डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. परंतु रिलीज अगोदरच चित्रपटाला प्रचंड विरोध केला जात असून, चित्रपट रिलीज होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चित्रपटाला विरोध करणाºया एक संघटनेने तर दीपिका आणि संजय लीला भन्साळी यांचे शीर कलम करणाºयास पाच कोटी रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे सांगितले आहे. 







दरम्यान, दीपिकानेदेखील कोणीही चित्रपटाला रिलीज होण्यावरून रोखू शकत नसल्याचे ठणकावून सांगितल्याने हा वाद आणखीच चिघळला आहे. दीपिकाने म्हटले की, ‘आम्ही सेन्सॉर बोर्डाला उत्तर दिले आहे. त्यामुळे अशाप्रकारचा विरोध करणे अनाठायी आहे. मला विश्वास आहे की, आम्ही ही लढाई जिंकू’. दरम्यान, राजपुत कम्युनिटी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि करणी सेनेने गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात चित्रपटाविरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. या संघटनांकडून मागणी करण्यात आली की, चित्रपट रिलीज करण्याअगोदर आम्हाला दाखविण्यात यावा. 

Web Title: Deepika Padukone made photoshoot in a smoky look, see her wounded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.