​यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार दीपिका पादुकोणचा जलवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 15:01 IST2017-03-19T09:31:45+5:302017-03-19T15:01:45+5:30

एका इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँडने दीपिका पादुकोणला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नेमले आहे. या ब्रँडमुळे दीपिका येत्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दिसू शकते. येत्या १७ व १८ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिवल होणार आहे.

Deepika Padukone to appear on Cannes red carpet this year? | ​यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार दीपिका पादुकोणचा जलवा?

​यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार दीपिका पादुकोणचा जलवा?

पिका पादुकोण सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. अलीकडे दीपिकाचा ‘एक्सएक्सएक्स: रिटर्न आॅफ झेंडरकेज’ हा हॉलिवूडपट येऊन गेला. या हॉलिवूडपटाने दीपिकासाठी संधींची अनेक कवाडे खुली केलीत, हे मात्र मानायलाच हवे. होय, कारण  एका इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँडने दीपिकाला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नेमले आहे. तेही कॅटरिना कैफ हिला डावलून. सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन या ब्रँडशी जुळलेल्या आहेत. दीपिकाच्या आधी कॅटरिना कैफ ही सुद्धा या ब्रँडशी कनेक्ट होती. पण आता दीपिका आल्यामुळे कॅटरिनाचा पत्ता कट झालाय. खुद्द दीपिकाच्या स्टाईलिस्टने याची माहिती दिलीय.



 कॅटरिना कैफचा कॉन्ट्रक्ट अर्थात करार संपला आणि संबंधित ब्रँडने दीपिकासोबत नवा कॉन्ट्रक्ट साईन करण्याचा निर्णय घेतला. या ब्रँडमुळे दीपिका येत्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दिसू शकते. येत्या १७ व १८ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिवल होणार आहे.

ALSO READ: दीपिका पादुकोण म्हणते, मी लग्नासाठी तयार नाही

याआधी २०१० मध्ये दीपिका कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली होती. रोहित बाल याने डिझाईन केलेल्या साडीत दीपिकाने कान्सच्या रेडकार्पेटवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला होता. यावर्षी दीपिका रेड कार्पेटवर उतरलीच तर कुठल्या स्टाईलमध्ये उतरेल, निश्चितपणे हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. गतवर्षी ऐश्वर्या राय बच्चन पर्पल लिपस्टिक लावून कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली होती. यामुळे तिला बºयाच टिकेला सामोरे जावे लागले होते. याऊलट सोनम कपूरने तिच्या आगळ्या-वेगळ्या फॅशन स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे यावर्षी कान्समध्ये कोण वरचढ ठरतं, याकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. आता ऐश्वर्या व सोनमला दीपिकासारखी स्पर्धक मिळालीच तर ही स्पर्धा अधिक चुरसीची होणार, हे नक्की!

Web Title: Deepika Padukone to appear on Cannes red carpet this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.