दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा अनुष्का शर्माशी होणार बॉक्स ऑफिसवर सामना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 11:25 IST2017-09-11T05:43:52+5:302017-09-11T11:25:39+5:30

संजय लीला भंसाळी सध्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत ...

Deepika Padukone and Ranveer Singh's Anushka Sharma face the box office! | दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा अनुष्का शर्माशी होणार बॉक्स ऑफिसवर सामना !

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा अनुष्का शर्माशी होणार बॉक्स ऑफिसवर सामना !

जय लीला भंसाळी सध्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत  दिसणार आहेत. हा चित्रपट नव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र आता या चित्रपटाची रिलीज टेड पुढे ढकलण्यात आली आहे. याच कारण म्हणजे चित्रपट अजून पूर्ण झालेला नाही. रिपोर्टच्या अनुसार हा चित्रपट आता पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमध्ये सुरू असताना तिथे त्यांना विरोध करण्यात आला त्यामुळे पद्मावतीची शूटिंग उशीरा सुरू झाली. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाले आहे. मात्र पोस्ट प्रोडक्शनचे काम बाकी आहे. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजला उशीर होऊ शकतो.  

ALSO READ :  दीपिका पादुकोणसोबतचे प्रायव्हेट फोटो डिलीट करण्यासाठी फोटोग्राफरवर धावून गेला रणवीर सिंग!

सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भंसाळी यांना चित्रपटाला घेऊन कोणतीच घाई करायची नाही. त्यांना या चित्रपटात सर्वोत्तम काम करायचे आहे. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजला जरी उशीर झाला तरी चालले, या चित्रपटाची रिलीज टेड देखील ते पुढे ढकलायला तयार आहेत. मात्र चित्रपटाला लागणार पुरेसा वेळ त्यांना द्यायचा आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2018 मध्ये रिलीज करण्याचा प्लॉन तयार करत आहेत. फेब्रुवारी 9 ला अनुष्का शर्माचा परी चित्रपट रिलीज होणार आहे. आतापर्यंत फब्रेुवारीमध्ये रिलीज होणार या चित्रपटाकडे बिग बजेट चित्रपट म्हणून पाहण्यात येत होते मात्र आता या चित्रपटाला पद्मावतीचा सामना करावा लागणार आहे. आधी पद्मावती 17 नोव्हेंबरला रिलीज करण्यात येणार होता. मात्र पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला लागणाऱ्या वेळामुळे चित्रपटाची रिलीज टेड भंसाळींवर पुढे टाकण्याची वेळ आली आहे.     

Web Title: Deepika Padukone and Ranveer Singh's Anushka Sharma face the box office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.