​संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटातही झळकणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:12 IST2018-02-01T10:42:27+5:302018-02-01T16:12:27+5:30

संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी, पद्मावत या चित्रपटात प्रेक्षकांना रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले ...

Deepika Padukone and Ranveer Singh to be seen in Sanjay Leela Bhansali's upcoming film? | ​संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटातही झळकणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग?

​संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटातही झळकणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग?

जय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी, पद्मावत या चित्रपटात प्रेक्षकांना रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. बाजीराव मस्तानी या चित्रपटातील रणवीर आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीची तर चर्चा चांगलीच रंगली होती. पद्मावत या चित्रपटात देखील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी खूप चांगले काम केले आहे. रणवीर आणि दीपिका हे दोघेही संजय लीला भन्सालीचे खूप लाडके आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटात देखील दीपिका आणि रणवीर मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे संकेत स्वतः संजय लीला भन्साली यांनी दिले आहेत.
पद्मावत या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे सध्या संजय लीला भन्साली प्रचंड खूश आहेत. त्यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना सांगितले, दीपिका ही सगळ्याच चित्रपटांसाठी खूप मेहनत घेते. तिला कधीच तिच्या भूमिकेविषयी टेन्शन नसते आणि त्यामुळे ती प्रत्येक भूमिका खूप चांगल्या प्रकारे सादर करते. रणवीर आणि माझी केमिस्ट्री खूप चांगली आहे. त्यामुळे रणवीरला मी जितक्या चांगल्या प्रकारे समजू शकतो, तितके त्याला कोणताच निर्माता चांगल्या प्रकारे समजू शकत नाही असे मला वाटते. तो त्याच्या भूमिकेत अक्षरशः जीव ओततो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 
संजय लीला भन्साली यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपिका आणि रणवीर यांचे भरभरून कौतुक केल्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत रणवीर आणि दीपिकाच झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. 
संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ अनेक वादानंतर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाचे नाव हे पूर्वी पद्मावती होते. पण सेन्सॉर बोर्डने दिलेल्या सुचनेनुसार या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. पद्मावत या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाने १०० कोटीच्या वर गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील रणवीर सिंगच्या कामाचे तर चांगलेच कौतुक करत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणच्या सौंदर्याची आणि कामाची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Also Read : ​​‘पद्मावत’साठी रणवीर सिंगला मिळाला पहिला खास पुरस्कार!

Web Title: Deepika Padukone and Ranveer Singh to be seen in Sanjay Leela Bhansali's upcoming film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.