DEATH threats!! सलमान खान सुटला पण वकील अडकला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 17:06 IST2017-01-29T08:47:42+5:302017-01-29T17:06:41+5:30
काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या सलमान खानला निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडणडणा-या वकीलास जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. होय, एका इंटरनॅशनल ...
.jpg)
DEATH threats!! सलमान खान सुटला पण वकील अडकला?
क ळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या सलमान खानला निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडणडणा-या वकीलास जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. होय, एका इंटरनॅशनल गँगस्टरने आपल्याला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा या वकीलाने केला आहे.
एचएम सारस्वत असे या वकीलाचे नाव आहे. अलीकडे जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकारप्रकरणाशी संबंधित आर्म्स अॅक्ट प्रकरणातून सलमानची निर्दोष सुटका केली. यानंतर सारस्वत यांना धमकीचे फोन आले. त्यांनी यासंदर्भात सांगितले की, सलमानची आर्म्स अॅक्ट प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर मला एक फोन आला. सलमानच्या निर्दोष सुटकेनंतर आता तुला कुणीही वाचवू शकत नाही. परिणाम भोगण्यासाठी तयार राहा, असे पलीकडून बोलणारा मला म्हणाला. पलीकडून बोलणारी ती व्यक्ति स्वत:ला इंटरनॅशनल गँगस्टर म्हणवत होती. या धमकीच्या फोननंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिस आयुक्त अशोक राठोड यांनीही या वृत्ताला दुलोरा दिला आहे. सारस्वत यांची तक्रार आमच्याकडे आली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
ALSO READ: सलमान खानला मिळाले नामांकन अन् भडकली वैभवी मर्चंट!!
Salman Khan Arms Act Case: 'या' व्यक्तिमुळेच सलमान खानची झाली निर्दोष मुक्तता?
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सलमान व त्याच्या सहका-यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ आॅक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ आॅक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची जामिनावर सुटका झाली होती. २००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रुपए दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटाची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. काळवीटची शिकार करणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर अशा विविध कलमांखाली सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजस्थान हायकोटार्ने गेल्यावर्षी जुलैमध्ये सलमानची काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती. कोर्टाने सलमान खानच्या परदेशवारीवर निर्बंध घातले होते. मात्र राजस्थान सरकारने याविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.