'दे दे प्यार दे २' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:39 IST2025-11-20T17:37:48+5:302025-11-20T17:39:21+5:30
. 'दे दे प्यार दे' या सिनेमाच्या या सिक्वेलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं. आत्तापर्यंत अजय देवगणच्या या सिनेमाने किती कोटी कमावले, ते जाणून घेऊया.

'दे दे प्यार दे २' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी
बहुचर्चित आणि ज्यांची प्रेक्षकांना उत्सुकता होती तो 'दे दे प्यार दे २' सिनेमा अखेर १४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 'दे दे प्यार दे' या सिनेमाच्या या सिक्वेलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं. आता सिनेमा प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आत्तापर्यंत अजय देवगणच्या या सिनेमाने किती कोटी कमावले, ते जाणून घेऊया.
'दे दे प्यार दे' या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता याच्या सीक्वेलसाठीही चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी या सिनेमाने ८ कोटींची कमाई केली होती. तर वीकेंडलाही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. वीकेंडला 'दे दे प्यार दे २' ने तब्बल २५ कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ४९ कोटींची कमाई केली आहे.
'दे दे प्यार दे २' सिनेमात अजय देवगण, रकुलप्रीत सिंग, अर्जुन पांचाळ, तबू, आर माधवन, मीझान जाफरी, जावेद जाफरी, गौतमी कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अंशुल शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.