शाहरूखने दिला होता 'डीडीएलजे'ला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 07:18 IST2016-01-16T01:17:06+5:302016-02-12T07:18:22+5:30
नुकतीच 'मेकिंग ऑफ डीडीएलजे' नावाची एक तासाची डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली. यात अनेक ऑफ स्क्रीन शॉट्स तसेच सेटवरचे वातावरण ...
.jpg)
शाहरूखने दिला होता 'डीडीएलजे'ला नकार
ुकतीच 'मेकिंग ऑफ डीडीएलजे' नावाची एक तासाची डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली. यात अनेक ऑफ स्क्रीन शॉट्स तसेच सेटवरचे वातावरण दाखवण्यात आले आहे. या निमित्त बोलताना शाहरूखने एक धक्कादायक बातमीचा खुलासा केला. तो म्हणाला, ' या चित्रपटाच्या आधी 'बाजीगर', 'डर', 'अंजाम' असे डार्क अँक्शन चित्रपट केल्यामुळे हा चित्रपट मला जास्त 'गर्लीश' वाटत होता. त्यामुळे मी सुरुवातीला नकार दिला. परंतु नंतर कसा कोण जाणे पण स्वीकारला. तसेच क्लायमॅक्सला अँक्शन सीन घेण्याबाबतही मी आग्रही होतो.' राज-सिमरन जोडीला घराघरात पोहचवणार्या या चित्रपटाने मोठे विक्रम केले.