​या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार गदर एक प्रेमकथा हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 12:21 IST2018-04-18T06:51:47+5:302018-04-18T12:21:47+5:30

भारत-पाकिस्तान यांच्यात १९४७ला झालेल्या फाळणीच्या पार्श्वभूमीवरील ‘गदर : एक प्रेमकथा’ हा चित्रपट दोन देशाच्या सीमा, धर्म आणि युद्ध या ...

On this day, the audience will see Ghadar's love story | ​या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार गदर एक प्रेमकथा हा चित्रपट

​या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार गदर एक प्रेमकथा हा चित्रपट

रत-पाकिस्तान यांच्यात १९४७ला झालेल्या फाळणीच्या पार्श्वभूमीवरील ‘गदर : एक प्रेमकथा’ हा चित्रपट दोन देशाच्या सीमा, धर्म आणि युद्ध या सर्वांवर भाष्य करतं. आपल्या ‘वो जमाना, करे दीवाना’ या ध्येयधोरणानुसार, ‘झी क्लासिक’ वाहिनी सनी देओल आणि आमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा अॅक्शनपट प्रसारित करणार आहे. नितीन केणी निर्मित आणि अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर : एक प्रेमकथा’ हा चित्रपट रविवार २२ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता प्रसारित केला जाईल.
भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसेमुळे आपल्या कुटुंबियांसोबत पाकिस्तानला जाणारी ट्रेन सकिना (आमिषा पटेल) पकडू शकत नाही. हिंसक जमाव मारण्यासाठी तिचा पाठलाग करतो, तेव्हा तारासिंग (सनी देओल) तिची त्यांच्यापासून सुटका करतो आणि तिला आपल्या घरी घेऊन येतो. पण सकिनाच्या विरोधातील हिंसक जमावापासून तिच्या शीलाचे रक्षण करण्यासाठी तारासिंग तिच्याशी विवाह करतो. प्रारंभी तारासिंगला आपला स्वीकारणे सकिनाला जड जाते, पण लवकरच ती त्याच्या प्रेमात पडते. पुढे अनेक वर्षं हे दोघे सुखाचा संसार करतात आणि त्यांना एक मुलगाही होतो. एके दिवशी एका वृत्तपत्रात तिचे वडील अश्रफ अली (अमरीश पुरी) यांची पाकिस्तानातील एका शहराचा महापौर म्हणून नियुक्ती झाल्याची बातमी तिच्या वाचनात येते. आपले वडील दंगलीत मारले गेले अशीच तिची समजूत झालेली असते. त्यानंतर पुढे तिच्या आयुष्यात काय होते हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळाले होते.
आनंद बक्षी यांच्या गीतांना उत्तमसिंग यांनी दिलेल्या चालींमुळे या चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांना फाळणीपूर्व भारताच्या वातावरणात घेऊन गेले होते. त्यातील ‘मैं निकला गड्डी लेके’ यांसारखे गीत प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लहर निर्माण करते, तर ‘उड जा काले कावा’ आणि ‘हम जुदा हो गए’ सारखी गाणी प्रेक्षकांना भावुक करतात.
गदर या चित्रपटाच्या कथेची आणि या चित्रपटातील सनी आणि अमिषाच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. सनी देओलला तर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता. 

Also Read : ताप असूनही श्रीदेवी यांनी केले होते ना जाने कहा से आयी है या गाण्याचे चित्रीकरण

Web Title: On this day, the audience will see Ghadar's love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.