भूमी पेडणेकरला करायचंय दंगल-2 काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:50 IST2017-12-20T10:20:45+5:302017-12-20T15:50:45+5:30

लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकरने आयुषनाव खुराणासोबत दम लगा के हईशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती आयुषमानसोबत शुभमंगल सावधान चित्रपटात ...

Dangle-2 work to do land peddle | भूमी पेडणेकरला करायचंय दंगल-2 काम

भूमी पेडणेकरला करायचंय दंगल-2 काम

कप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकरने आयुषनाव खुराणासोबत दम लगा के हईशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती आयुषमानसोबत शुभमंगल सावधान चित्रपटात दिसली होती. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या टॉयलेट- एक प्रेमकथा चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली होती. नुकत्याच पार पडलेल्या  स्टार स्क्रीन पुरस्कारांमध्ये मान्य केले की तिला दंगल २ चा हिस्सा बनायचे आहे. भूमी या शो चे सूत्रसंचालन क्रिती सेनॉन आणि दिग्गज अभिनेत्री सीमा पहवासोबत करत होती. या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार दंगल चित्रपटाच्या टीमने पटकावले. यामुळे भूमी अतिशय प्रभावित झाली. दंगलचे दिग्दर्शक नितिश तिवारी यांना बेस्ट स्टोरीसाठी ॲवॉर्ड मिळाला, तेव्हा भूमी म्हणाली, “मला सामाजिक संदेश  देणाऱ्या चित्रपटांचा हिस्सा बनायचे आहे आणि दंगल निश्चितपणे यात सगळ्यात वर आहे. मला दंगल २ चा हिस्सा बनायचे आहे.” त्यामुळे आता नितिश तिवारी आणि आमिर खानला भूमीचे बोलणं किती ऐकतात हे कळेलच.  

सध्या भूमी अभिषेक चौबे यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या चित्रपटात काम करीत आहे. भूमीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. भूमी म्हणाली की,  तिने अनेक पुरुषांना डेट केले आहे. भूमीने म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास तेव्हा मी लहान होती. खूपच भोळी आणि इन्मॅच्योर होती. त्यामुळे हे कधी आणि कसे घडत गेले हे मला कळालेच नाही. परंतु आता मी माझ्या सर्व एक्स बॉयफ्रेंडची चांगली मैत्रिण आहे. मला असे वाटते की, हा असा अनुभव आहे ज्यामुळे तुमची व्यक्ती म्हणून जडणघडण होते. यावेळी भूमीने हादेखील खुलासा केला की, सध्या मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नसून, सिंगल आहे. भूमीने म्हटले की, कामाव्यतिरिक्त मला दुसरी कुठलीही एक्साइटमेंट नाही. मी बºयाचशा को-स्टारसोबत काम न केल्याने माझ्याविषयी कुठल्याही प्रकारची अफवा नाही. थोडक्यात, तुम्ही असे समजू शकता की, सध्या माझे कामाबरोबरच लग्न झाले आहे. भूमीने यावेळी हेदेखील स्पष्ट केले की, ती रिलेशनमध्ये राहण्याच्या विरोधात नाही. सध्या मी माझ्या कामाचा आनंद घेत आहे. 

ALSO READ :  भूमी पेडणेकर म्हणते, लग्नाअगोदर सेक्स करण्यात गैरच काय?, असं तर सगळेच करतात!

Web Title: Dangle-2 work to do land peddle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.