​‘साहो’साठी प्रभासने घेतला एक ‘धोकादायक’ निर्णय! वाचा संपूर्ण बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 15:12 IST2017-10-30T09:42:29+5:302017-10-30T15:12:29+5:30

‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा आगामी चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असे चाहत्यांना झाले आहे. प्रभासच्या याच चित्रपटाबद्दल एक ताजी ...

'Dangerous' decision taken for 'shoho'! Read the whole news !! | ​‘साहो’साठी प्रभासने घेतला एक ‘धोकादायक’ निर्णय! वाचा संपूर्ण बातमी!!

​‘साहो’साठी प्रभासने घेतला एक ‘धोकादायक’ निर्णय! वाचा संपूर्ण बातमी!!

ाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा आगामी चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असे चाहत्यांना झाले आहे. प्रभासच्या याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, प्रभासने म्हणे या चित्रपटासाठी एक धोकादायक निर्णय घेतला आहे. आता हा धोकादायक निर्णय कुठला तर बॉडी डबल न वापरण्याचा. ‘साहो’मध्ये अनेक जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स आहेत. अगदी जीवावर बेतू शकतील असे हे अ‍ॅक्शन सीन्स प्रभासने स्वत: करू नये, असे मेकर्सचे मत होते. यासाठी त्याने बॉडी डबल वापरावे, असा सल्ला प्रभासला देण्यात आला होता. पण प्रभासने म्हणे त्यास नकार दिला आणि अ‍ॅक्शन सीन्स स्वत: करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्ससाठी हॉलिवूडच्या काही नावाजलेल्या अ‍ॅक्शन कोरिओग्राफरची मदत घेतली गेली आहे. या तज्ज्ञांच्या हातात आपण सुरक्षित आहोत, याबद्दल प्रभासच्या मनात कुठलीही शंका नाही. पण ‘साहो’चे दिग्दर्शक सुजीथ यांना मात्र प्रभासची काळजी वाटतेय. प्रभास कुठलाही अ‍ॅक्शन सीन करताना जखमी होवू नये, असे त्यांचे प्रयत्न आहेत. पण प्रभास कुणाचेही काहीही मानायला तयार नाही.

‘बाहुबली’च्या शूटींगदरम्यान असाच एक अ‍ॅक्शन सीन करताना प्रभास जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या खांद्याला इजा झाली होती. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यामुळेच सुजीथ यांनी प्रभासला बॉडी डबल वापरण्याचा सल्ला दिला होता. पण प्रभास काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने त्यांचाही नाईलाज झालायं. आता केवळ ‘साहो’चे शूटींग निर्विघ्न पार पडावे, एवढीच त्यांची इच्छा आहे. आपणही हीच सदिच्छा करूयात आणि प्रभासला त्याच्या या चित्रपटासाठी शुभेच्छा देऊ यात. 

ALSO READ: ​काही तासांत पकडली गेली ‘बाहुबली’ प्रभासची ‘चोरी’! हॉलिवूडची केली कॉपी!!

सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची वर्णी लागली आहे. चित्रपटात ती डबलरोल साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धा प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे.   प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यासारख्या बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे.

Web Title: 'Dangerous' decision taken for 'shoho'! Read the whole news !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.