‘डान्स’ आहे ‘या’ चित्रपटांचा प्राण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 14:59 IST2017-06-07T09:29:58+5:302017-06-07T14:59:58+5:30
टायगर श्रॉफ एक उत्तम डान्सर आहे आणि आपले हे स्किल दाखवण्यासाठी त्याला एक चित्रपटही मिळाला आहे. साबीर खान दिग्दर्शित ...

‘डान्स’ आहे ‘या’ चित्रपटांचा प्राण!
एबीसीडी
कोरिओग्राफरचा दिग्दर्शक झालेल्या रेमो डिसूजाचा पहिला चित्रपट ‘एबीसीडी- एनीबडी कॅन डान्स’ अशीच एक डान्स मुव्ही होती. डान्स हाच या चित्रपटाचा केंद्रबिंदू होता. काही न्यूकमर्स आणि डान्सिंग सेंसेशन प्रभुदेवा व केके मेनन यात लीड रोलमध्ये होते. हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाच्या यशानंतर रेमोने याचा सीक्वल ‘एबीसीडी2’ आणला. वरूण धवन आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसलेत. हा चित्रपटही प्रेक्षकांना भावला होता.
रब ने बना दी जोडी
‘रब ने बना दी जोडी’ हा २००८ मध्ये आलेला चित्रपट पती-पत्नीच्या संबंधावर आधारित होता. पण डान्स या कथेचा महत्त्वपूर्ण भाग होता. या चित्रपटात अनुष्काने डान्सप्रति कमालीची पॅशनेट असलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. तिला प्रभावित करण्यासाठी शाहरूखला स्वत:चे लूक बदलावा लागतो. केवळ इतकेच नाही तर तिच्यासाठी डान्स शिकावा लागतो, असे यात दाखवले गेले होते.
आजा नच ले
सन २००७ मध्ये आलेला ‘आजा नच ले’ हा सिनेमा डान्स याच मध्यवर्ती संकल्पनेभोवती फिरणारा होता. डान्स थिएटर वाचवण्यासाठी झटणाºयांची कथा यात दाखवली गेली होती. माधुरी दीक्षितने यात कोरिओग्राफरची भूमिका साकारली होती.
दिल तो पागल है
‘दिल तो पागल है’ या चित्रपटाचेही डान्सची नाते होते. शाहरूख खान या चित्रपटात एक डान्स ग्रूप चालवत असतो. डान्स आणि त्याभोवती गुंफलेली प्रेम कथा याचा सुरेख मेळ या चित्रपटात दिसला होता.
डिस्को डान्सर
डान्स मुव्ही आणि मिथुन चक्रवर्तीच्या ‘डिस्को डान्सर’चा उल्लेख होणार नाही, असे शक्यच नाही. १९८२ मध्ये आलेल्या या चित्रपटात मिथुनने स्ट्रिट परफॉर्मरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्याकाळातील तरूणाईसाठी हा चित्रपट खºया अर्थाने ‘डान्स अँथम’ ठरला होता.
नाचे मयुरी
‘नाचे मयुरी’ हा १९८६ साली आलेला चित्रपट. टी रामा राव दिग्दर्शित हा चित्रपट बॉलिवूडचे पहिले बायोपिक म्हटले तरी चालेल. एक पाय गमावूनही डान्स न सोडणाºया एका समर्पित मुलीची कहानी यात दाखवली गेली होती. ही मुलगी म्हणजे सुधा चंद्रन. तिनेच या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
डान्स डान्स
सन १९८७ मध्ये आलेला ‘डान्स डान्स’ हा मिथुन चक्रवर्तीचा आणखी एक डान्स थिमवर आधारित चित्रपट. मिथुनमधील डान्स पॅशन यानिमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मिथुनसोबत स्मिता पाटील, मंदाकिनी, अमरिश पुरी, शक्ती कपूर आदी यात दिसले होते.
सरगम
सन १९७६ साली आलेला ‘सरगम’ हा एका तेलगू चित्रपटाचा रिमेक़ ऋषी कपूर आणि जयाप्रदा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात एक मूक मुलगी आणि एक पोरका मुलगा यांची ही कथा. अद्भूत डान्स आणि कर्णमधूर गाणी यासाठी हा चित्रपट ओळखला जातो.
नवरंग
सन १९५९ मध्ये आलेला ‘नवरंग’ हा आणखी एक क्लासिकल डान्सवर आधारित चित्रपट. आपल्या पत्नीत मोहिनी नावाच्या कल्पनेला जन्म देणाºया एका कवीची कथा यात साकारली आहे. या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली होती.
झनक झनक पायल बाजे
१९५५ मध्ये आलेला हा चित्रपट म्हणजे दोन समर्पित क्लासिकल डान्सरची स्टोरी. नृत्य या दोघांना जवळ आणते, पुढे दूर करत आणि अखेर पुन्हा नृत्य हेच त्यांना जोडणारा सांधा ठरतो, अशी एक पे्रमकथा या चित्रपटात गुंफली गेली होती. व्ही शांताराम दिग्दर्शित या चित्रपटात गोपी कृष्णा आणि संध्या लीड रोलमध्ये होते.