डान्स शिकता-शिकता राधिका आपटे पडली प्रेमात, गुपचुप जाऊन केले होते लग्न !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 11:36 IST2017-09-09T06:05:23+5:302017-09-09T11:36:57+5:30
आपल्या हॉट अंदाजमुळे राधिका आपटे नेहमीच चर्चेत असते. 7 सप्टेंबरला ही अभिनेत्री 32 वर्षांची झाली आहे. राधिकाचे बाबा डॉ. ...
.jpg)
डान्स शिकता-शिकता राधिका आपटे पडली प्रेमात, गुपचुप जाऊन केले होते लग्न !
आ ल्या हॉट अंदाजमुळे राधिका आपटे नेहमीच चर्चेत असते. 7 सप्टेंबरला ही अभिनेत्री 32 वर्षांची झाली आहे. राधिकाचे बाबा डॉ. चारुदत्त आपटे न्यूरोसर्जन आहेत. राधिकाने इकॉनोमिक्स मधून डिग्री घेतली आहे. याच दरम्यान ती रोहिणी भाटे यांच्याकडून 8 वर्षे कथकची तालीम घेत होती. यानंतर ती लंडनमध्ये डान्सचा एक वर्षांचा डिप्लोमा करण्यासाठी गेली आणि तिकडे डान्स करता करता तिला तिचा जोडीदार मिळाला. राधिकाने 2012मध्ये संगीतकार बेनेडिक्ट टेलरबरोबर रजिस्टर्ड मॅरेज केले. दोघांची ओळख 2011 मध्ये डिप्लोपाचा अभ्यास करताना झाली. याच ठिकाणी दोघांनामध्ये प्रेमाची ठिणगी पडली आणि दोघे एक लिव्ह इनमध्ये राहायला लागले. जवळपास एक वर्ष लिव्ह इऩमध्ये राहिल्यानंतर राधिका आणि बेनेडिक्टने गपचुप जाऊन लग्न केले. यानंतर दोघांनी एक महिन्यानंतर लग्न केल्याची अधिकृत घोषणा केली. राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरुन केली. 2005 मध्ये आलेल्या शाहिद कपूरच्या लाईफ हो तो ऐसी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तिला ओळख मिळाली ती 'शोर इन द सिटी' चित्रपटातून. राधिका जास्त चर्चेत आली ती कॉन्ट्रोवर्शिअल लीक झालेल्या व्हिडिओमुळे. पार्च्डमध्ये लीक झालेल्या न्यू़ड सीन्समुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.
ALSO READ : पाहा, राधिका आपटेचे काही बोल्ड फोटो!!
बदलापूर, अहिल्या, पार्च्ड, मांझी द माउंटेन मॅन या चित्रपटात ती झळकली आहे. लवकरच ती अक्षय कुमारचा आगामी चित्रपट पॅडमॅनमध्ये सुद्धा दिसणार आहे. 2016 मध्ये कबाली चित्रपट तिने दक्षिणाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. लग्नानंतर राधिका लंडनमध्ये स्थित झाली आहे मात्र चित्रपटांच्या शूटिंगसाठी ती भारतात येत असते.