डेजी शाह म्हणते, दाक्षिणात्य चित्रपट तांत्रिकदृष्या अधिक विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 16:47 IST2017-02-23T09:45:48+5:302017-02-23T16:47:41+5:30

‘दबंग’ स्टार सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री डेजी शाहने हिंदी चित्रपटापेक्षा दाक्षिणात्य चित्रपट तांत्रिकदृष्या अधिक प्रभावशाली आहेत ...

Daisi Shah says, the southern film technically more developed | डेजी शाह म्हणते, दाक्षिणात्य चित्रपट तांत्रिकदृष्या अधिक विकसित

डेजी शाह म्हणते, दाक्षिणात्य चित्रपट तांत्रिकदृष्या अधिक विकसित

बंग’ स्टार सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री डेजी शाहने हिंदी चित्रपटापेक्षा दाक्षिणात्य चित्रपट तांत्रिकदृष्या अधिक प्रभावशाली आहेत असे मत व्यक्त केले आहे. डेजी म्हणते, बॉलिवूड आणि दक्षिणेतील चित्रपटांत असलेले सर्वांत मोठे अंतर म्हणजे तेथील तंत्रज्ञान अधिक विकसित आहे. 

सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘जय हो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी डेजी शाह हिने हेट स्टोरी ३मध्ये काम केले आहे. दरम्यान ती दाक्षिणात्य चित्रपटात व्यस्त होती. कन्नड चित्रपट ‘बॉडीगार्ड’ व ‘बच्चन’मध्ये भूमिका साकारणारी डेजी शाह हिला दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील तंत्रज्ञानाने भुरळ पाडली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीनुसार डेजी म्हणाली, जगात विविध ठिकाणी चित्रपटाची निर्मिती केली जाते. प्रत्येक ठिकाणी काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आपल्या देशातही बॉलिवूड आणि टॉलीवूड वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. दक्षिण भारतीय चित्रपटात काम करताना मला एक गोष्टी समजली ती म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आहे. तर बॉलिवूडमध्ये कलात्मकतेला जास्त प्राधान्य दिले जाते. 



डेजी शाह हिचा मागील चित्रपट ‘हेट स्टोरी ३’ हा २०१५ साली रिलीज झाला होता. ‘स्मॉल बजेट बिग प्रॉफिट’ असलेल्या हेट स्टोरी सिरीजने बॉलिवूडमध्ये नवा ट्रेन्ड आणला आहे. दिग्दर्शक गोविंद सकरिया यांच्या ‘रामरतन’ या चित्रपटात डेजी शाह महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ऋषि भुटानी मुख्य भूमिका साकारत आहे. मध्यंतरीच्या काळात डेजी शाह हिने स्टेजवर परर्फामन्स दिले होते. तिच्या कामाची अनेकांनी दखल घेतली होती. मात्र सलमान सोबत डेब्यू करून देखील डेजीच्या करिअरला फारशी गती मिळाली नाही. 

Web Title: Daisi Shah says, the southern film technically more developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.