डब्बू अकंलला गोविंदाने बनवले ‘स्टार’, पण हृतिकने केले ‘फेल’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 21:10 IST2018-07-05T20:56:33+5:302018-07-05T21:10:49+5:30

डब्बू अंकलचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडीओने त्यांना रातोरात स्टार बनवले. 

dabbu uncle dance video on hritik roshan song kaho na pyaar hai | डब्बू अकंलला गोविंदाने बनवले ‘स्टार’, पण हृतिकने केले ‘फेल’!!

डब्बू अकंलला गोविंदाने बनवले ‘स्टार’, पण हृतिकने केले ‘फेल’!!

आपल्या धमाकेदार डान्स स्टेप्सने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बू अंकल यांना न ओळखणारा आता विरळाच. डब्बू अंकलचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडीओने त्यांना रातोरात स्टार बनवले. सलमान खानपासून गोविंदा, सुनील शेट्टीपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी डब्बू अंकला खास भेटीसाठी बोलवले. यानंतर डब्बू अंकल अनेक गाण्यांवर डान्स करताना दिसले. पण त्या पहिल्या व्हिडिओच्या तुलनेत डब्बू अंकलची लोकप्रीय घटली.




अलीकडे डब्बू अंकलनी हृतिक रोशनच्या ‘कहों ना प्यार है’ या चित्रपटातील ‘कहों ना प्यार हैं’ या गाण्यावर ठेका धरला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. पण हा व्हिडिओही फेल ठरला. जितकी लोकप्रीयता गोविंदाच्या गाण्यांवर डान्स करून मिळाली, तितकी हृतिकच्या गाण्यावर डान्स करून त्यांना मिळवता आली नाही.
खरे तर डब्बू अंकलच्या या मजेशीर डान्समागे एक दु:खान्तिका आहे. अलीकडे सलमान खानच्या ‘दस का दम’ या कार्यक्रमात स्वत: डब्बू अंकलनी याचा खुलासा केला होता. गत वर्षी डब्बू अंकलच्या लहान भावाचे रेल्वे अपघातात निधन झाले होते. या घटनेने त्यांच्या कुटुंबाला हादरवून सोडले होते. त्यांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला होता. तिने हसणे-बोलणे सोडले होते़. आपल्या खोलीतूनही ती बाहेर पडेना. त्यादिवशी घरातील आवाज ऐकून ती पहिल्यांदा खोलीतून बाहेर आली. तिने डब्बू अंकलचा व्हिडिओ पाहिला आणि ती हसायला लागली. आपल्या आईला भावाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा हसताना बघून डब्बू अंकलही नाचू लागलेत.

Web Title: dabbu uncle dance video on hritik roshan song kaho na pyaar hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.