RR, CSK की KKR? सुप्रसिद्ध अभिनेत्याने IPL 2024 च्या विजेतेपदावर केली भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 11:09 AM2024-05-06T11:09:57+5:302024-05-06T11:11:58+5:30

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याने IPL 2024 मध्ये कोण जिंकणार याविषयी भाष्य केलंय (ipl 2024, csk, kkr)

CSK, KKR or RR Famous actor predicts IPL 2024 winner team | RR, CSK की KKR? सुप्रसिद्ध अभिनेत्याने IPL 2024 च्या विजेतेपदावर केली भविष्यवाणी

RR, CSK की KKR? सुप्रसिद्ध अभिनेत्याने IPL 2024 च्या विजेतेपदावर केली भविष्यवाणी

सध्या IPL 2024 ची चांगलीच चर्चा आहे. IPL 2024 मध्ये यंदा मुंबई इंडियन्सने सर्वांची चांगलीच निराशा केली. याशिवाय सततच्या पराभवामुळे विराट कोहलीच्या RCB ला सुद्धा प्लेऑफमधून बाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे. यंदाच्या IPL 2024 मध्ये विजेतेपदासाठी CSK, RR आणि KKR हे संघ शर्यतीत आहेत. अशातच सुप्रसिद्ध अभिनेता आणि समीक्षक KRK अर्थात कमाल आर. खानने IPL 2024 मध्ये कोण बाजी मारणार याची भविष्यवाणी केलीय. 

IPL 2024 मध्ये कोणती टीम विजेती होणार याविषयी केआरकेने ट्विट केलंय. त्याने लिहिलंय की, "माझं IPL विषयी भाकीत: धोनीने आधीच सरेंडर केलंय. त्यामुळे CSK जिंकू शकत नाही. त्यामुळे RR आणि KKR या दोघांपैकी एक टीम IPL 2024 जिंकू शकते." अशाप्रकारे KRK ने IPL 2024 च्या विजेतेपदावर त्याची भविष्यवाणी केलीय. अनेकांनी त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवली असून अनेकांना पटलं नाहीय.

IPL 2024 मध्ये पॉईंट टेबलवर नजर मारली तर टॉप ४ मध्ये पहिल्या नंबरवर कोलकाता नाईट रायडर्स दिसून येतेय. तर दुसऱ्या नंबरवर राजस्थान रॉयल्स पाहायला मिळतेय. तिसऱ्या नंबरवर चेन्नई सुपर किंग्ज तर चौथ्या नंबरवर सनरायजर्स हैदराबाद पाहायला मिळतेय. यापैकी कोलकाताने आतापर्यंत फक्त तीन सामने गमावून अव्वल नंबरवर स्थान मिळवलंय. तर IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच ११ सामन्यांपैकी फक्त ३ सामने जिंकल्याने मुंबई इंडियन्स तळाशी आहे.

Web Title: CSK, KKR or RR Famous actor predicts IPL 2024 winner team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.