वरुण धवनच्या ‘फर्स्ट क्लास’ या गाण्यावरचा हा मजेशीर व्हिडीओ एकदा बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 16:00 IST2019-03-31T16:00:00+5:302019-03-31T16:00:07+5:30
‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे ‘फर्स्ट क्लास’ हे गाणे सध्या लोकांच्या ओठांवर आहे. वरूण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यावर चित्रीत या गाण्याला एका आठवड्यात ५० लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत. सोशल मीडियावरही हे गाणे जोरात आहेत. अशात भन्नाट नेटकऱ्यांना कोण रोखणार?

वरुण धवनच्या ‘फर्स्ट क्लास’ या गाण्यावरचा हा मजेशीर व्हिडीओ एकदा बघाच!
‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे ‘फर्स्ट क्लास’ हे गाणे सध्या लोकांच्या ओठांवर आहे. वरूण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यावर चित्रीत या गाण्याला एका आठवड्यात ५० लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत. सोशल मीडियावरही हे गाणे जोरात आहेत. अशात भन्नाट नेटकऱ्यांना कोण रोखणार? होय, ‘फर्स्ट क्लास’ गाणे रिलीज झाले आणि पाठोपाठ या गाण्याचा एक क्रॉस ओव्हर व्हिडीओ तयार झाला. तूर्तास हा क्रॉसओव्हर व्हिडीओ इंटरनेटच्या दुनियेत धूम करतोय. या व्हिडीओची खास बात म्हणजे, तो पाहिल्यानंतर तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही. अगदी वरूण धवन हाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपले हसू रोखू शकला नाही.
I think this is india. Sab kuch apna hain including @donaldglover. Love thisssssssss https://t.co/N3XyYcccKU
— Varun ZAFAR Dhawan (@Varun_dvn) March 30, 2019
चाइल्डिश गॅम्बिनोचे हिट साँग ‘धीस इज अमेरिका’ आणि ‘फर्स्ट क्लास’ची जुगलबंदी अशी काही जमून आली आहे की, हसून हसून पोट दुखेल. या क्लिपच्या व्हिज्युअलमध्ये गॅम्बिनो नाचतोय आणि बॅकग्राऊंडमध्ये ‘फर्स्ट क्लास’ गाणे वाजतेय. या फनी व्हिडीओ पाहून वरूण, कियारा, आयुष्यमान खुराणा, एनलिन शर्मा असे सगळे खो-खो हसत सुटले. वरूणने हा व्हिडीओ रिटिष्ट्वट करत, ‘मला वाटते, हा भारत आहे..’असे लिहिले.
— Kiara Advani (@Advani_Kiara) March 29, 2019
आत्तापर्यंत ‘कलंक’चे तीन गाणे रिलीज झाले आहेत. या तिन्ही गाण्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात आलिया भट्ट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशी भलीमोठी स्टारकास्ट आहे.