अखेर संकट टळले! सारा अली खानने सोडला सुटकेचा निश्वास!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 10:28 IST2018-05-31T04:58:00+5:302018-05-31T10:28:00+5:30
सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘केदारनाथ’वर अनेक संकटे आलीत आणि प्रत्येकवेळी या ना त्या प्रकाराने ते टळले. एकार्थाने सारा ...
.jpg)
अखेर संकट टळले! सारा अली खानने सोडला सुटकेचा निश्वास!!
स रा अली खानचा आगामी चित्रपट ‘केदारनाथ’वर अनेक संकटे आलीत आणि प्रत्येकवेळी या ना त्या प्रकाराने ते टळले. एकार्थाने सारा हिच्यावरचेचं संकट टळले होते. काही दिवसांपूर्वी सारा एका कायदेशीर वादात सापडली होती. कारण होते, ‘केदारनाथ’चा दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि ‘सिम्बा’चा दिग्दर्शक रोहित शेट्टी या दोघांना एकच शूटींग डेट्स दिल्याचे. या प्रकरणातून साराला बाहेर काढण्यासाठी तिचा डॅड सैफ अली खानही मैदानात उतरला होता. खबर खरी मानाल तर ‘केदारनाथ’च्या निर्मात्यांनी साराविरोधात कोर्टात धाव घेत, पाच कोटी रूपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. ‘केदारनाथ’च्या निर्मात्यांनी केलेल्या दाव्यानुसार, साराने आधी ‘केदारनाथ’ला जून व जुलैमधील डेट्स दिल्या होत्या. पण अभिषेक कपूर व प्रेरणा अरोरा यांच्यातील वादानंतर याच डेट्स तिने रोहित शेट्टींच्या ‘सिम्बा’ला दिल्यात. काही दिवसानंतर ‘केदारनाथ’च्या निर्मितीची जबाबदारी रॉनी स्क्रूवालाने आपल्या खांद्यावर घेतली आणि साराच्या डेट्स मिळत नसल्याचे पाहून तिला कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला. पण आता कदाचित ही वेळ येणार नाही. होय, ताज्या बातमीनुसार, हा वाद कोर्टाबाहेरचं निकाली निघाला आहे. अभिषेक कपूर आणि रोहित शेट्टी यांनी हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचा निर्णय घेतला आहे, यासंदर्भात नुकतीच रोहित व अभिषेक यांच्यात एक मीटिंग झाल्याचेही कळतेय. प्राप्त माहितीनुसार, आता साराला ‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’चे शूटींग सोबत सोबत करावी लागेल आणि रोहित व अभिषेकला याबद्दल कुठलीही तक्रार नसेल.
ALSO READ : या कारणामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सारा अली खान अडकली वादाच्या भोवऱ्यात
‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून त्यात एक पॅशनेट लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सारा एक साध्या आणि गर्ल नेक्स्ट डोअरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न आहे तर सुशांत सिंग राजपूत चित्रपटात पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे.