विनयभंगप्रकरणी रेमो फर्नांडिसविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:38 IST2016-01-16T01:09:09+5:302016-02-09T10:38:26+5:30
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पॉप स्टार रेमो फर्नांडिस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गोवा पोलिसांनी शुक्रवारी रेमोविरुद्ध गुन्हा दाखल ...

विनयभंगप्रकरणी रेमो फर्नांडिसविरुद्ध गुन्हा
अ ्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पॉप स्टार रेमो फर्नांडिस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गोवा पोलिसांनी शुक्रवारी रेमोविरुद्ध गुन्हा दाखल केला. रेमोच्या मुलाने १ डिसेंबर रोजी त्या मुलीला जाणीवपूर्वक कारने धडक देऊन जखमी केले. त्यानंतर दोन दिवस ज्या रुग्णालयात ती मुलगी दाखल झाली होती, तिथे जाऊन तिला त्रास दिला गेला, असा रेमोवर आरोप आहे. रेमोने मात्र हा आरोप फेटाळाला आहे.
पोलिसांनी मुलीची तक्रार नोंदवून घेतली. रेमो रुग्णालयात आला होता किंवा त्या मुलीला भेटला होता काय याची चौकशी केली. गोवा बालगुन्हे कायद्याखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर रेमोचा मुलगा जोनाहविरुद्ध हयगयीने गाडी चालविणे आणि जखमी करणे याबाबत गुन्हा दाखल केला आहे.