राब्ता' हा 'मगधीरा'चा कॉपी असल्याचा निर्मात्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 17:06 IST2017-05-26T09:19:14+5:302017-05-26T17:06:07+5:30

सुशांत सिंग राजपूत आणि कृति सेनन यांचा राब्ता हा चित्रपट तेलगू सुपरहिट चित्रपट मगधीरा ची स्टोरी कॉपी केल्याचा आरोप ...

The creator's allegation is that Rabta is a copy of 'Magadhera' | राब्ता' हा 'मगधीरा'चा कॉपी असल्याचा निर्मात्याचा आरोप

राब्ता' हा 'मगधीरा'चा कॉपी असल्याचा निर्मात्याचा आरोप

शांत सिंग राजपूत आणि कृति सेनन यांचा राब्ता हा चित्रपट तेलगू सुपरहिट चित्रपट मगधीरा ची स्टोरी कॉपी केल्याचा आरोप लावण्यात येतोय. मगधीरा चित्रपटाचा निर्माता अल्लु अरविंद यांने याबाबत हैदराबाद कोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी राब्ताच्या टीमने सुद्धा एक प्रेस रिलीज जारी केली आहे.
दिग्दर्शक दिनेश विजन यांने या चित्रपटाव्दारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. फिल्म समीक्षक तरुण आदर्श ने राब्ताच्या निर्मांत्यातर्फे एक स्टेटमेंट ट्वीट केले आहे. काही मीडियाच्या रिपोर्टनुसार गीता आर्ट्स राब्ताच्या विरोधात हैदराबाद कोर्टात गेले आहेत. मात्र आमच्याकडे याबाबत कोणतेच कागदपत्र आली नाही आहेत. त्यामुळे आम्ही यावर कोणतीच टिप्पणी करणार नाही. 


या स्टेटमेंट पुढे लिहिण्यात आले आहे, 'राब्ता' ची स्टोरी 'मगधीरा'वरुन कॉपी केलेली नाही आहे. हे खूप अपमानजनक आहे तुम्ही फक्त 2 मिनिटांचा ट्रेलर बघुन एखाद्या व्यक्तीच्या मेहनतीला कॉपीचे नाव देता हे योग्य नाही.  या प्रकरणाची सुनावणी 1 जूनला कोर्टात होणार आहे. राब्ताच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे निकाल त्यांच्या बाजूने लागेल असा त्यांना विश्वास आहे. तर मगधीराचा निर्माता अल्लु अरविंदने राब्ता चित्रपटाच्या निर्मात्यांवर त्यांच्या मगधीराची युनिक स्टोरी कॉपी केल्याचा आरोप लावला आहे. त्यांचे म्हणणे आहे कोर्टा याप्रकरणी योग्य तो निकाल आम्हाला देईल.  
गेल्या काही दिवसांपासून सुशांत आणि कृतिमध्ये असलेल्या रिलेशनशीपच्या चर्चेला घेऊन. त्यांची केमिस्ट्री पाहाण्यासाठी त्यांचे चाहत्ये नक्कीच उत्सुक होते मात्र आता कोर्टाचे निर्णय घेईपर्यंत चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे सांगणे थोडे कठिणच आहे. 

Web Title: The creator's allegation is that Rabta is a copy of 'Magadhera'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.