'स्काय ड्रायव्हिंग'साठी मुग्धा 'क्रेझी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:41 IST2016-01-16T01:18:34+5:302016-02-07T12:41:37+5:30
मुग्धा गोडसे आगामी 'इश्क ने क्रेझी किया रे' या आगामी चित्रपटात थोडीशी नकारात्मकतेकडे झुकणारी भूमिका साकारत आहे. याच अनुशंगाने ...

'स्काय ड्रायव्हिंग'साठी मुग्धा 'क्रेझी'
म ग्धा गोडसे आगामी 'इश्क ने क्रेझी किया रे' या आगामी चित्रपटात थोडीशी नकारात्मकतेकडे झुकणारी भूमिका साकारत आहे. याच अनुशंगाने एका मुलाखती दरम्यान तिला आतापर्यंतच्या आयुष्यात तिने केलेली सगळ्यात 'क्रेझी' गोष्ट कोणती याबाबत विचारण्यात आले. तेव्हा मुग्धा म्हणाली 'मला वाटतं की 'स्काय ड्रायव्हींग' ही माझ्या आयुष्यात मी के लेली सगळ्यात क्रेझीएस्ट गोष्ट आहे. पण आता मला असं वाटत की याच क्रेझीएस्ट गोष्टीमुळे मला उंचीची जी भिती वाटत होती ती नाहीशी होण्यास मदत झाली.' 'इश्क ने ..' चे दिग्दर्शन नरेश मल्होत्रा यांनी केले असून संतोष कटारा, राधेशाम शर्मा, अलोक सिंग यांनी एकत्रितपणे 'आर.एस.जी. फिल्म्स' या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे.