काय सांगता? ‘जलसा’त शिरले वघवाघूळ; अमिताभ बच्चन यांची उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 11:52 AM2020-04-26T11:52:45+5:302020-04-26T11:54:30+5:30

अमिताभ यांचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले. अनेकांनी त्यांच्या या ट्विटवर मजेशीर कमेंट्स केल्या.

coronavirus bat entered amitabh bachchan house jalsa actor tweet-ram | काय सांगता? ‘जलसा’त शिरले वघवाघूळ; अमिताभ बच्चन यांची उडाली भंबेरी

काय सांगता? ‘जलसा’त शिरले वघवाघूळ; अमिताभ बच्चन यांची उडाली भंबेरी

googlenewsNext
ठळक मुद्देजलसामध्ये वटवाघूळ शिरल्याच्या निमित्ताने का होईना युजर्सचे काही वेळ मनोरंजन झाले.

चीनमधील वटवाघळांमुळे कोरोना विषाणू जगभर पसरला, असे मानले जात आहे. त्यामुळे  वटवाघळांचे नाव ऐकले तरी धडकी भरावी, अशी सध्या स्थिती आहे.  एखादे वटवाघुळ तुमच्या घरात शिरले तर काय? याची कल्पनाही न केलेली बरी. अशात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरात एक वटवाघूळ शिरले आणि खुद्द महानायकाची भंबेरी उडाली.

होय, अमिताभ यांनी स्वत: ट्विटरवर याची माहिती दिली आहे.  ‘देवियों और सज्जनों, या तासाची बातमी़ ब्रेकिंग न्यूज... एक वटवाघूळ जलसात तिस-या माळ्यावरील माझ्या खोलीत शिरले, यावर तुम्ही विश्वास ठेवाल? कसेबसे त्याला बाहेर काढले. कोरोना पिच्छाच सोडत नाहीये,’ असे ट्विट अमिताभ यांनी केले.


अमिताभ यांचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले. अनेकांनी त्यांच्या या ट्विटवर कमेंट्स केल्या. यापैकी काही कमेंट चांगल्याच मजेशीर आहेत. ‘सर, ‘रामगोपाल वर्मा की आग’ दिखा देते उसको फिर सारे चमगादर मुंबई छोड के भाग जाते,’ अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिली. एकाने तर या वटवाघळाचा संबंध थेट रेखांशी जोडला. होय, रेखा मॅम ने भेजा होगा कॅमेरा लगा के, असे एका युजरने यावर लिहिले. यावरचे काही मीम्सही व्हायरल झालेत. 

काहींनी मात्र या ट्विटवरून अमिताभ यांना सल्लाही दिला. वटवाघळांमुळे कोरोना पसरत नाही, तेव्हा असे ट्विट करून गैरसमज पसरवू नको, असे अनेकांनी त्यांना सांगितले.
एकंदर काय तर जलसामध्ये वटवाघूळ शिरल्याच्या निमित्ताने का होईना युजर्सचे काही वेळ मनोरंजन झाले.

Web Title: coronavirus bat entered amitabh bachchan house jalsa actor tweet-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.