Corona Effect: कोरोनामुळे सोनम कपूर सासूलाही म्हणते दूर 'रहोना' Video viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 14:30 IST2020-03-19T14:23:52+5:302020-03-19T14:30:40+5:30
सोनम आणि आनंदच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे बोललं जात आहे. ती प्रेग्नंट असल्यामुळे तिने सर्वात जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे.

Corona Effect: कोरोनामुळे सोनम कपूर सासूलाही म्हणते दूर 'रहोना' Video viral
सध्या परदेशातून येणा-या प्रवाशांची अशाच प्रकारे तपासणी सुरु असून त्यांना काही दिवसांसाठी आयसोलेटेड एरियामध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सोनम कपूरलाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अशा प्रकारे बंद खोलीत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकतीच सोनम कपूर लंडनहून भारतात परतली आहे. त्यामुळे तिने कोरोनापासून बचावासाठी स्वतःला तिच्या घरी एका बंद खोलीत बंदिस्त करून ठेवले आहे. त्यामुळे सध्या ती कोणाच्याच संपर्कात नाही. सोनमसह बोलण्यासाठी तिची सासु खिडकीमधून तिच्याशी बोलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोनमची रूम पहिल्या मजल्यावर असून तळ मजल्यावर समोरच सासूची रूम आहे. तसेच जवळ येणे घातक असल्यामुळे तळमजला ते पहिला मजला असा दोघांमध्ये सुरु असलेला संवाद या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ मजेशीर असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोनम आणि आनंदच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे बोललं जात आहे. ती प्रेग्नंट असल्यामुळे तिने सर्वात जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे.प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळतंय. यावर अजूनतरी सोनमकपूर कडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी तिचे काही फोटोच या गोष्टीचा पुरावा असल्याचे समजतंय.
.