Corona Effect: दिलीप कुमारनंतर आणखीन एका कलाकाराला ठेवले आयसोलेशनमध्ये, सुरू आहे तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 13:51 IST2020-03-17T13:51:12+5:302020-03-17T13:51:43+5:30
. भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

Corona Effect: दिलीप कुमारनंतर आणखीन एका कलाकाराला ठेवले आयसोलेशनमध्ये, सुरू आहे तपासणी
कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये, म्हणून संबंधित व्यक्तिला क्वारंटाईन वा आयसोलेशनमध्ये ठवेले जाते. म्हणजेच, हवेशीर बंद खोलीत वेगळे ठेवले जाते. दिलीप कुमार यांना कोरोनाची लागण झालेली नाही. पण त्यांची नाजूक प्रकृती बघता, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिलीप कुमार पाठोपाठ आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचे माहिती त्यांच्या पीआर टीमकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच युरोप आणि लंडन येथे दौरा करून आले आहे. त्यांची कोणत्याही प्रकारची कोरोना टेस्ट करण्यात आलेली नाही. ते ठणठणीत बरे आहेत. मात्र ज्या देशांतून ते दौरे करून आले आहेत. तेथे कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गेल्या दोन दिवसांपासून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची अधिकृत माहिती मीडियाला देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसने आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांचा जीव घेतला असून आत्तापर्यंत दीड लाखांवर लोकांना या व्हायरसची लागण घातली आहे. भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.