‘ट्युबलाईट’चा टीजर आहे हॉलिवूडपटाची कॉपी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 10:58 IST2017-05-05T05:23:36+5:302017-05-05T10:58:45+5:30

तुम्हाला ठाऊक आहे का की, ‘ट्युबलाईट’चा टीजर एका हॉलिवूड सिनेमाची कॉपी आहे. होय, आपण अगदी बरोबर ऐकलेत. ‘ट्युबलाईट’चा टीजर ‘लिटिल ब्वॉय’ या हॉलिवूडपटाची कॉपी आहे.

Copywriting copy of 'Tubelite' | ‘ट्युबलाईट’चा टीजर आहे हॉलिवूडपटाची कॉपी!!

‘ट्युबलाईट’चा टीजर आहे हॉलिवूडपटाची कॉपी!!

मान खानचा ‘ट्युबलाईट’चा टीजर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दैनंदिन काम करण्यात काहीसा ‘मंद’ असलेल्या व्यक्तिची भूमिका सलमानने यात साकारली आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचा टीजर कालच रिलीज झाला आणि काहीच तासांत हजारो लोकांनी तो बघितला. पण तुम्हाला ठाऊक आहे का की, ‘ट्युबलाईट’चा टीजर  एका हॉलिवूड सिनेमाची कॉपी आहे. होय, आपण अगदी बरोबर ऐकलेत. ‘ट्युबलाईट’चा टीजर ‘लिटिल ब्वॉय’ या हॉलिवूडपटाची कॉपी आहे. ‘लिटिल ब्वॉय’ अन् सलमानचा ‘ट्युबलाईट’ या दोन्ही चित्रपटांची कथा मिळती-जुळती आहे.   फरक तो एवढाच की, ‘ट्युबलाईट’मध्ये सलमान ५० वर्षांचा आहे आणि ‘लिटिल ब्वॉय’मध्ये एका आठ वर्षांच्या मुलाची कथा दाखवली गेली आहे.







ALSO READ : ​‘ट्युबलाईट’चा टीजर पाहाच!!

‘लिटिल ब्वॉय’ हा चित्रपट वर्ल्ड वॉर2 अर्थात दुसºया महायुद्धावर आधारित कथा आहे. आठ वर्षांच्या एका शाळा शिकणाºया मुलाभोवती चित्रपटाची संपूर्ण कथा फिरते. या मुलाला त्याच्या उंचीवरून चिडवले जात असते. याचदरम्यान दुसºया महायुद्धादरम्यान सैनिक असलेल्या त्याच्या वडिलांना बंदी बनवले जाते आणि मग हा लिटिल ब्वॉय सगळ्या आव्हानांचा सामना करत आपल्या पित्याला शोधण्यासाठी बाहेर पडतो. 



या ‘लिटिल ब्वॉय’चा ट्रेलर आणि ‘ट्युबलाईट’चा टीजर पाहिल्यानंतर आम्ही काय बोलतोय, हे तुम्हाला कळून येईलच. ‘ट्युबलाईट’मध्ये हॉलिवूडपटाची कथाच कॉपी केली गेली नाहीय, तर यातील काही सीन्सही हुबेहुब जसेच्या तसे उचलण्यात आले आहेत. किंग खान शाहरूखचा ‘ट्युबलाईट’मध्ये कॅमिओ आहे. तो बेन चॅपलिनची भूमिका साकारतो आहे. खरे तर ‘लिटिल ब्वॉय’ फ्लॉप ठरला होता. आता असे असताना सलमानचा ‘ट्युबलाईट’ बॉक्सआॅफिसवर कसा ठरतो, ते आपण बघूच!

Web Title: Copywriting copy of 'Tubelite'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.