controversial break- ups

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 19:51 IST2016-03-18T11:41:14+5:302016-03-18T19:51:04+5:30

रील लाईफमध्ये प्रेमकथा साकारणाºया बॉलिवूडमधील अनेक नायक-नायिकांची प्रेमप्रकरणे रिअल लाईफमध्येही खूप गाजली आहेत. यातील काही जोडप्यांनी तर या अलवार ...

controversial break-ups | controversial break- ups

controversial break- ups

ल लाईफमध्ये प्रेमकथा साकारणाºया बॉलिवूडमधील अनेक नायक-नायिकांची प्रेमप्रकरणे रिअल लाईफमध्येही खूप गाजली आहेत. यातील काही जोडप्यांनी तर या अलवार नात्याला आयुष्यभर जपून आदर्श प्रेमाचा वस्तूपाठच घालून दिला आहे. परंतु याच बॉलिवूडमध्ये काही जोडपी अशीही आहेत ज्यांनी प्रेम नावाच्या या निरलस भावनेचा अक्षरश: बाजार मांडला. परस्परांची मने जपण्यासाठी जीवाचे रान करणाºया या प्रेमीयुगुलांमध्ये कुठल्याशा कारणावरून बिनसले आणि एकमेकांवर जाहीर चिखलफेक करण्यापर्यत त्यांची मजल गेली. बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन आणि क्वीन कंगना रानोट यांच्यात सध्या जे काही सुरू आहे हे त्याचेच ताजे उदाहरण आहे़  परंतु बॉलिवूडमध्ये असे पहिल्यांदाच घडतेय असे अजिबात नाही. याआधीही अनेक जोडप्यांनी असाच मार्ग निवडला आहे. काहींनी तर या गोड नात्याचा शेवट करण्यासाठी चक्क न्यायालयाची पायरीही चढली आहे. पाहूया असेच काही शॉकिंग ब्रेकअप्स...
हृतिक रोशन - कंगना रनोट
सन २०१४ मध्ये आलेली हृतिक व सुजान यांच्या काडीमोडाची बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती़ सुजानने घटस्फोट का घेतला, हे अद्यापही अनुत्तरीत आहे़ पण कदाचित कंगना रनोट ही हृतिक व सुजानच्या आयुष्यातील ‘व्हिलन’ ठरली असावी, अशी चर्चा आता रंगत आहे़ सुजानसोबत काडीमोड घेतल्यानंतर लगेच हृतिकने कंगनाला प्रपोज केले आणि त्यानंतर बँग बँगच्या चित्रीकरणादरम्यान हृतिक कॅटरिनाकडे आकर्षित झाला. परंतु इथून पुढे काही जमले नाही आणि हृतिक व कंगनात वाद सुरू झाले आणि आता तर या सिक्रेट लव्हस्टोरीची निष्पती एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवण्यापर्यंत गेली आहे़



सलमान खान - ऐश्वर्या राय
‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सलमान खान ऐश्वर्यांच्या सौंदर्यावर भाळून तिच्या प्रेमात पडला़  ही लव्हस्टोरी फार काळ लपून राहिली नाही़  मात्र सलमानच्या विचित्र वागण्यामुळे काहीच दिवसांत सलमान व ऐश्वर्याच्या ब्रेकअपच्या बातम्याही चव्हाट्यावर आल्या़ एकेरात्री सलमान ऐश्वर्याच्या घरी गेला़  खिडकी तोडून तो आत शिरला़ यानंतर तिच्या सेटवर गेला आणि तिथे त्याने ऐश्वयार्ला मारहाण केली. ही बातमी मीडियाची ब्रेकिंग न्यूज ठरली़  पुढे अपेक्षित तेच घडले. सलमान व ऐश्वर्या कायमचे वेगळे झाले.



जॉन अब्राहम - बिपाशा बसू
जॉन आणि बिपाशाचे ब्रेक-अप ही बातमी त्यांच्या चाहत्यांना पचवणे अधिक कठीण गेली़  कारण जॉन -बिपाशा ही जोडी दो जिस्म,एक जान बनली होती. खुद्द जॉन व बिप्स यांनीही आपले नाते कधीच लपवले नाही़ मात्र अचानक, जॉन प्रियासोबत लग्न करणार असल्याचा बातम्या आल्या आणि जॉन व बिप्सचे ब्रेक-अप झाले, हे स्पष्ट झाले. बिप्सने दगा दिल्याचे जॉनने अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले. पण, बिप्स मात्र बेधडकपणे नवीन प्रेमाच्या शोधात पुढे गेली. 



रणबीर कपूर - दीपिका पदुकोण
सावरियां स्टार रणबीर कपूर आणि डिम्पल गर्ल दीपिका यांची लव्हस्टोरीही तशी खूप गाजली़ हे दोघे लग्न करणारच, असा आशावाद या दोघांचेही चाहते खूप आत्मविश्वासाने व्यक्त करायचे. पण माशी कुठे शिंकली कोण जाणे, एका वळणावर अचानक दोघांनीही आपल्या प्रेमकहानीवर फुलस्टॉप लावला़ या ब्रेकअपनंतर दीपिका भावनिकदृष्टया पार कोलमडून पडली़ इतकी की तिला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी ट्रिटमेंटही घ्यावी लागली़


प्रिती झिंटा आणि नेस वाडिया
प्रीती झिंटा ही नेस वाडिया या बिझनेसमॅनच्या प्रेमात पडली़ या प्रेमप्रकरणादरम्यान त्यांचे भावनिक नाते व्यावहारिक झाले. एकमेकांवर विश्वास ठेवून त्यांनी आयपीएलममध्ये भागीदारी केली. ही भागीदारी चांगलीच गाजली़ पण, भावनांवर व्यवहार भारी पडला आणि भागीदारीचा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला़ अखेर एक दिवस अतिशय धक्कादायकरित्या प्रीती व नेसच्या सुंदर नात्याचा वाईट अंत झाला. 
 


शाहीद कपूर-करिना कपूर
शाहीद आणि करिना यांच्यातील लिंकअपच्या बातम्या आल्या तसे या कपलकडे कपल आयडियल कपल म्हणून पाहिले जाऊ लागले़ पण तितक्याच धक्कादायकपणे हे कपल वेगळे झाले़   शाहीदसोबतच्या अफेअर्सच्या बातम्या सुरु असतानाच बेबो कशी कोण जाणे, सैफ अली खानच्या प्रेमात पडली़ शाहीदही उडत्या पंछी सारखा दुसºया फांदीवर जावून बसला़,़


 
प्रियंका चोपडा-हरमन बावेजा
प्रियंका आणि हरमन बावेला यांची लव्हस्टोरी ‘लव्ह स्टोरी2050’ दरम्यान बहरली़ मात्र हा चित्रपट आपटताच प्रियंकाने हरमनशी अंतर राखणे सुरू केले़, आता आम्ही एकमेकांचा चेहराही पाहणार नाही, इथपर्यंत हरमन म्हणाला़

Web Title: controversial break-ups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.