confirms !! ​ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 10:46 IST2017-06-21T05:16:54+5:302017-06-21T10:46:54+5:30

अद्यापही काही बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर नाहीत. यात रणबीर कपूरचे नाव सगळ्यांत वर आहे. याच यादीत असेच आणखी एक ...

confirms !! Aishwarya Rai Bachchan to come on social media! | confirms !! ​ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर येणार!

confirms !! ​ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर येणार!

्यापही काही बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर नाहीत. यात रणबीर कपूरचे नाव सगळ्यांत वर आहे. याच यादीत असेच आणखी एक नाव आहे. हे नाव म्हणजे, ऐश्वर्या राय बच्चन. पण आता ऐश्वर्याचे नाव या यादीतून गाळले जाणार आहे. होय, कारण ऐश्वर्या लवकरच सोशल मीडिया डेब्यू करणार आहे. स्वत: ऐश्वर्याने हे कन्फर्म केले आहे. 
अलीकडे एका मुलाखतीत ऐश्वर्याला तिच्या सोशल मीडिया डेब्यूबद्दल विचारण्यात आले. यावर ऐश्वर्या दिलखुलास हसली. थँक यू फॉर आकिंग मी. थिंकींग, अभी भी होप है, असे ऐश्वर्या म्हणाली. कदाचित सोशल मीडियावर येण्याची वेळ आली आहे. कारण काळाची ती हाक आहे. सगळेच मला सोशल मीडिया डेब्यूबद्दल विचारतात. मी सोशल मीडियावर यावे, असे माझ्या चाहत्यांना वाटत असेल तर मी नक्कीच याचा गंभीरपणे विचार करेल, असे ऐश्वर्या या प्रश्नाच्या उत्तरादाखल तिने सांगितले.

तसे अनेक सेलिब्रिटींनी त्यांची पर्सनल अ‍ॅप्स आणण्याचा पर्यायही निवडला आहे. ऐश्वर्या यावरही विचार करू शकते. आता ऐश्वर्या यापैकी कुठला पर्याय निवडते, ते योग्य वेळ येताच कळेल. पण ऐश्वर्याने सोशल मीडियावर यावे, ही तिच्या चाहत्यांची मनापासून इच्छा आहे. तेव्हा ऐश्वर्याचा लवकरात लवकर सोशल मीडियावर ग्रॅण्ड डेब्यू व्हावा, हीच अपेक्षा करूयात.
अलीकडे ऐश्वर्या करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये दिसली होती.लवकरच ऐश्वर्या  आपल्या नव्या चित्रपटांत बिझी होणार आहे. मनी रत्नम आणि राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या चित्रपटांत ऐश्वर्या झळकणार आहे. 

ALSO READ : ​फॅशनमध्ये आई ऐश्वर्यापेक्षा कुठेही कमी नाही आराध्या!
 

Web Title: confirms !! Aishwarya Rai Bachchan to come on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.