​भारतीय मॉडेल्समध्ये आत्मविश्वास वाढलाय - मिलिंद सोमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 22:04 IST2017-01-28T16:34:47+5:302017-01-28T22:04:47+5:30

मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमन आपल्या सकारात्मक विचारासाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी देखील तो चांगलाच फिट असून ...

Confidence in Indian models has increased - Milind Soman | ​भारतीय मॉडेल्समध्ये आत्मविश्वास वाढलाय - मिलिंद सोमन

​भारतीय मॉडेल्समध्ये आत्मविश्वास वाढलाय - मिलिंद सोमन

डेल व अभिनेता मिलिंद सोमन आपल्या सकारात्मक विचारासाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी देखील तो चांगलाच फिट असून मॉडेलिंग क्षेत्रातही तो सक्रिय आहे. मिलिंद सोमन याने भारतीय मॉडलेची प्रशंसा के ली आहे. भारतीय मॉडेल्स व्यवसायिक दृष्ट्या स्वत:ला बदलण्यात यशस्वी ठरले असून ते कोणत्याही आंतरराष्ट्रीय रॅम्पवर वॉक करू शकतात, असे मत मिलिंद सोमन याने व्यक्त केले आहे. 

मागील काही वर्षांत भारतीय मॉडेलिंगचे बदलते स्वरूप यावर देशातील पहिला सुपरमॉडेल मिलिंद सोमन याने आपली प्रतिक्रिया दिली. मिलिंद म्हणाला, देशातील आताचे मॉडेल्स पूर्वीपेक्षा आत्मविश्वासाने भरलेले आहेत, ते आपल्या करिअरमध्ये विशेषज्ञांची भूमिकेत दिसू लागले आहेत. आता असे वाटू लागले आहे की, जगातील कोणत्याही ठिकाणी ते रॅम्प वॉक करू शकतात. हा विचार किती प्रेरणादायी आहे हे तुम्ही अनुभवू शकता. माझ्या मते संपूर्ण फॅशन इंडस्ट्रीमध्ये लोकांचा एक समूह जो सर्वांत चांगला काम करतो आहे त्यात मॉडलिंग या क्षेत्राचा उल्लेख करावा लागेल. मॉडेल्स हे डिझायनर्स, फोटोग्राफर आणि स्टायलिश यांच्या तुलनेत अधिक चांगले काम करीत आहेत, माझ्या मते भारतीय मॉडेल्स अशा ठिकाणी पोहचले आहे ज्याला आपण आंतरराष्ट्रीय दर्जा म्हणू शकतो. 

मिलिंद सोमन भारतातील पहिला सुपर मॉडेल म्हणून ओळखला जातो, आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक जाहिरातीसाठी मॉडलिंग केले आहे. यासोबतच त्याने अनेक चित्रपटात कामही केले आहे. नुकतेच त्याने एक मॅरेथान स्पर्धा पूर्ण केली होती यामुळे तो चर्चेत आला होता. आपले मॉडेलिंग बद्दलचे विचार मांडून तो नव्या युवकांना प्रेरणा देतो आहे असेच म्हणावे लागेल. 

मिलिंदने सेल्फी काढण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला २० पुश अप्स मारायला लावल्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. मिलिंदने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 
 

Web Title: Confidence in Indian models has increased - Milind Soman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.