कंगणा-शाहीदमध्ये वैचारिक मतभेद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 11:23 IST2016-06-10T05:53:25+5:302016-06-10T11:23:25+5:30

‘रंगून’ चित्रपटात कंगणा राणावत आणि शाहीद कपूर हे एकत्र काम करणार आहेत. त्यांच्यासोबत सैफ अली खान देखील असणार आहे. ...

Conceptual differences in Kangana-Shahid! | कंगणा-शाहीदमध्ये वैचारिक मतभेद !

कंगणा-शाहीदमध्ये वैचारिक मतभेद !

ंगून’ चित्रपटात कंगणा राणावत आणि शाहीद कपूर हे एकत्र काम करणार आहेत. त्यांच्यासोबत सैफ अली खान देखील असणार आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना कंगणा म्हणाली होती,‘ मी ‘रंगून’ चा तिसरा हिरो आहे.’ तेव्हा तिने बोलताना शाहीदकडे पाहिले. त्याला शाहीदने कसा प्रतिसाद दिला ते फारच उत्तम आहे.

तो म्हणाला,‘ खरंतर रंगून हा चित्रपट तीन हिरोईन असलेला आहे. ती असे का म्हणाली नाही की, तीन हिरोईन असलेला हा चित्रपट आहे? हिरोईन होण्यात काही कमीपणा आहे का? चित्रपटाचा मुख्य अभिनेता म्हणून माझ्यासाठी हिरो आणि हिरोईन यांच्यात मला काही फरक वाटत नाही.

मी त्या विचारप्रणालीशी स्वत:ला जुळवू शकत नाही. ’‘रंगून’ हा चित्रपट विशाल भारद्वाज दिग्दर्शित असून यात शाहीद -कंगणा आणि सैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

Web Title: Conceptual differences in Kangana-Shahid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.