Commando-2 effect : पाहा, अदा शर्माच्या बोल्ड अ‍ॅक्शन ‘अदा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 17:32 IST2017-01-22T09:15:10+5:302017-01-22T17:32:09+5:30

बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल अदा शर्मा हिने आपल्या बोल्ड अदांनी सगळ्यांनाच घायाळ केले होते. लवकरच अदा शर्मा ‘कमांडो2’ या चित्रपटात ...

Commando-2 effect: See, Ad Sharma's bold action 'Ada'! | Commando-2 effect : पाहा, अदा शर्माच्या बोल्ड अ‍ॅक्शन ‘अदा’!

Commando-2 effect : पाहा, अदा शर्माच्या बोल्ड अ‍ॅक्शन ‘अदा’!

लिवूडची ग्लॅमरस गर्ल अदा शर्मा हिने आपल्या बोल्ड अदांनी सगळ्यांनाच घायाळ केले होते. लवकरच अदा शर्मा ‘कमांडो2’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी अदाने  अतिशय बोल्ड फोटोशूट केले आहे. समीप सिंह याने अदाचे हे बोल्ड फोटो कॅमे-यात कैद केले आहेत. या फोटोंमध्ये अदा फॅशन डिझाईनर गेब्रियॅलाने डिझाईन केलेल्या कॉस्चुममध्ये दिसतेय. ‘कमांडो2’ या अ‍ॅक्शनपटात अदा शर्मा जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. यासाठी तिने बराच घाम गाळला आहे. या फोटोशूटमध्येही अदा अ‍ॅक्शन अवतारात दिसतेय.   ‘कमांडो इफेक्ट’ असलेले अदाचे हे फोटोशूट पाहून तुम्ही नव्याने अदांच्या अदांनी घायाळ झाल्यावाचून राहणार नाही.



या फोटोत अदा तलवारबाजी करताना दिसतेय. बोल्ड आणि ग्लॅमरस रूपातील अशी तलवारबाजी तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नसेल.



या फोटोत अदा शर्माने बॉक्सिंग ग्लब घातलेले आहेत. 



दुस-या फोटोत अदाच्या हातात आहे ती गन. होय, ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील अदाच्या हातात ‘हॉट गन’.

 दिग्दर्शक विक्रम भट्टच्या ‘१९२०’ या चित्रपटाने अदा शर्माला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. आता अदा ‘कमांडो2’मध्ये विद्युत जामवाल याच्या अपोझिट दिसतेय. आता आपल्या घायाळ करणा-या अदांची अ‍ॅक्शनची जादू किती चालते, ते बघूच.
‘कमांडो2’ हा ‘कमांडो’ या  सिनेमाचा सिक्वल आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. काल परवा चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे.  विद्युत जामवाल आणि अदा शर्मा यांची यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा येत्या मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ईशा गुप्ताचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Related news : ​विद्युत जामवालच्या दमदार अ‍ॅक्शनचा डोज तयार : ‘कमांडो २’ चे टिझर रिलीज

 

Web Title: Commando-2 effect: See, Ad Sharma's bold action 'Ada'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.