कॉमेडियन कपिल शर्माने घेतला सनी लिओनीशी पंगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 11:13 IST2017-11-20T05:43:16+5:302017-11-20T11:13:16+5:30
कपिल शर्माने स्टँडअप कॉमेडियन म्हणून मनोरंजन जगतात पाऊल ठेवले होते. पण यानंतर त्याने बॉलिवूड अॅक्टर बनत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का ...

कॉमेडियन कपिल शर्माने घेतला सनी लिओनीशी पंगा!
क िल शर्माने स्टँडअप कॉमेडियन म्हणून मनोरंजन जगतात पाऊल ठेवले होते. पण यानंतर त्याने बॉलिवूड अॅक्टर बनत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि आता तर कपिल प्रोड्यूसरही बनला आहे. होय, स्वत:च्याच ‘फिरंगी’ या आगामी चित्रपटाचा कपिल प्रोड्यूसर आहे. पण प्रोड्यूसर बनलेल्या कपिलच्या पहिल्याच चित्रपटाने संघर्ष ओढवून घेतला आहे. त्याचा संघर्ष दुस-या कुणासोबत नाही तर हॉट अॅण्ड बोल्ड सनी लिओनीसोबत आहे. होय, येत्या २४ नोव्हेंबरला कपिलचा ‘फिरंगी’ रिलीज होतो आहे. याच दिवशी सनी लिओनी आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खान याचा ‘तेरा इंतजार’ हा सिनेमा रिलीज होतो आहे. म्हणजेच बॉक्सआॅफिसवर ‘फिरंगी’ विरूद्ध ‘तेरा इंतजार’ असा सामना रंगणार आहे. आता या सामन्यात कोण विजयी होतं, ते लवकरच कळेल.
कपिल शर्माचा ‘फिरंगी’ एक परियड ड्रामा आहे. इंग्रज आवडणा-या मंगाची कथा यात सांगितली आहे. तर ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट एका पेन्टरची कथा आहे. कपिल आपल्या चित्रपटात गतकाळातील कथा सांगताना दिसणार तर ‘तेरा इंतजार’मध्ये सनीचा जलवा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सनीची फॅन फॉलोर्इंग मोठी आहे. अर्थात कपिलही याबाबतीत सनीपेक्षा कमी नाही. सनी आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवण्यात तरबेज आहे तर कपिल कॉमेडिचा बादशाह आहे. तूर्तास दोघेही आपआपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळेच आता बॉक्सआॅफिसवर दोघांपैकी कोण बाजी मारतं, हे पाहणे प्रचंड इंटरेस्टिंग ठरणार आहे.
ALSO READ : कपिल शर्माची भाची समायराने केले ‘फिरंगी’चे प्रमोशन...पाहा, एक क्यूट व्हिडिओ!
‘फिरंगी’ हा कपिलचा दुसरा चित्रपट आहे. याआधी २०१५ मध्ये कपिलचा ‘किस किस को प्यार करूं’ हा चित्रपट रिलीज झाला होता. ‘फिरंगी’मध्ये प्रेमाचा एक कोणही आहे. कपिल शर्मा एका देशी मुलीच्या प्रेमात पडतो. पण ही मुलगी पुढे इंग्रजी भाषेच्या प्रेमात पडते. आपले प्रेम मिळवण्याच्या नादात कपिल इंग्रजी राजवटीविरोधात मैदानात उतरतो, असे या चित्रपटाचे कथानक असल्याचे कळतेय. या चित्रपटात दोन नायिका आहेत. एक तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता आणि दुसरी मोनिका गिल.