बॉलीवूडमधील जोड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:43 IST2016-01-16T01:10:18+5:302016-02-10T12:43:56+5:30
धमेंद्र - हेमा मालिनी : 'तूम हसीन मैं जवान'च्या शूटिंग दरम्यान वीरू (धमेंद्र) बसंतीच्या (हेमा मालिनी) प्रेमात पडला. त्यावेळी ...

बॉलीवूडमधील जोड्या
राज बब्बर - स्मिता पाटील : या जोडप्यांत अश्रूंना स्थान नव्हेत असे म्हणायला हरकत नाही. पत्नी नादिरा बब्बर व मुलगा आर्य यांच्यासाठी देखीलअशीच स्थिती होती. नादिराने दोघांचे संबध उदार मनाने स्वीकार केले. दोघांच्या विवाहाबाबत नादिरा हिचा विचार काही वेगळा दिसतो. ती म्हणते, स्मीताला माझ्या नवर्यासोबत राहायला आवडत होते. तिला त्याचा सहवास हवा होता. दोघांच्या अफेअरची चर्चा माझ्या कानावर आली होती. पण मी तिचा स्वीकार केला, तिला आपल्या घरी जागा दिली. आम्ही सर्वांनी एकमेकांचा कायम आदर केला. मात्र ही प्रेमकथा फार काळ चालली नाही. प्रसूती दरम्यान स्मीताचा मृत्यू झाला. राज परत नादिराकडे आला तर प्रतीक ची देखरेख त्याच्या आजोबांनी केली.
मिथुन चक्रवर्ती - श्रीदेवी : श्रीदेवी मिथुनच्या प्रेमात पडली त्यावेळी मिथुनचा योगिता बालीशी विवाह झाला होता. त्यांनी लपून विवाह केला असल्याच्याही सांगण्यात येत होते. ही गोष्ट योगिता बालीपासून लपवून ठेवली गेली. याच तणावातून योगिता बालीने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशीही अफवा उडली. यानंतर त्यांनी विवाह न करण्याचे ठरविले. अखेर श्रीदेवीने बोनी कपूरशी विवाह केला. बोनी देखील विवाहित होता. त्यांने या सुंदरीसाठी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला, मुलालाही सोडले.
आदित्य पांचोली - कंगना राणावत : कंगना राणावत स्ट्रगल करीत असताना ती आदित्य पांचोलीला भेटली. या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यावेळी या दोघांत सुमारे 20 वर्षांचे अंतर होते. आदित्य विवाहित होता व त्याला मुलेही होतीच. दरम्यान दोघांत वितुष्ट आले. याच काळात आदित्य पांचोलीने कंगनाला घर विकत घेण्यासाठी मोठी रक्कम दिल्याची वार्ता पसरली. या दरम्यान कंगनाच्या बहिणीवर अँसिड हल्ला झाला. यावेळी हॉस्पिटलचे बील आदित्यने दिल्याची बातमी आली होती. यात कंगनाला आरोपी करण्यात आले होते.
cnxoldfiles/strong> : संजय खान याने आधीच अभिनेत्री झरीन खान हिच्याशी निकाह केला होता. मात्र तो स्वत:ला झीनत अमान सारख्या बोल्ड व ब्युटीफुल अभिनेत्रीसोबत विवाह करण्याचा मोहापासून आवरू शकला नाही. पण, दोघेही एकत्र राहू शकले नाहीत. संजयची पत्नी झरीनच नव्हे तर झीनतचे अपंगत्व यासाठी कारणीभूत ठरले. झीनतने आपला एक डोळा गमविला सोबतच तिची प्रकृती ढासळू लागली आणि ही कथाही तेथेच संपली.