‘कॉफी विद करण’ नाही तर ‘कॉफी विद करण अ‍ॅण्ड करिना’ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 11:41 IST2017-01-16T11:41:11+5:302017-01-16T11:41:11+5:30

करिना कपूरने प्रसूतीपूर्वी शूट केलेला ‘कॉफी विद करण’चा एपिसोड काल प्रसारित झाला. या चॅटशोच्या क्लायमॅक्समध्ये करण जोहर जे बोलला ...

'Coffee Withdrawal' But 'Coffee With Karan And Kareena'? | ‘कॉफी विद करण’ नाही तर ‘कॉफी विद करण अ‍ॅण्ड करिना’ ?

‘कॉफी विद करण’ नाही तर ‘कॉफी विद करण अ‍ॅण्ड करिना’ ?

िना कपूरने प्रसूतीपूर्वी शूट केलेला ‘कॉफी विद करण’चा एपिसोड काल प्रसारित झाला. या चॅटशोच्या क्लायमॅक्समध्ये करण जोहर जे बोलला ते ऐकून क्षणभर कुणाचाच आपल्या कानावर विश्वास बसेना. पण होय, करण अगदी सहजपणे बोलून गेला. काय, माहित आहे? ‘कॉफी विद करण’चे नवे सीझन करिना कपूरसोबत को-होस्ट करायला त्याला आवडेल, असे करण यावेळी बोलून गेला. विशेष म्हणजे, हे सगळे करण अगदी मनापासून बोलला.

‘कॉफी विद करण’मध्ये काल पाचव्यांदा करिना कपूर सामील झाली होती. पहिला सीझनपासून करिना गेस्ट म्हणून या लोकप्रीय चॅट शोमध्ये येत आहे. यंदाचे ‘कॉफी विद करण’चे पाचवे सीझन. या सीझनमध्ये करिनाने सोनम कपूरसोबत हजेरी लावली. प्रत्येक सीझनमध्ये करिनाचा गेस्ट अपिअरन्स यादगार राहिला. काल या करिना आली आणि पुन्हा एकदा करणच्या शोला तिने ‘चार चाँद’ लावले.  करणच्या या चॅट शोमध्ये वारंवार यायला आवडेल, असे करिना म्हणाली. यावर करणला सुद्धा राहावले नाही. केवळ तुलाच नाही तर मला सुद्धा माझ्या शोमध्ये तू वारंवार यावीस, असे वाटते. मी जोपर्यंत हा शो होस्ट करतोय, तोपर्यंत प्रत्येक सीझनमध्ये तू माझी गेस्ट असतील आणि एकदिवस माझी को-होस्ट सुद्धा, असे करण म्हणाला. करणच्या या वाक्यामुळे करिनाची तर चांगलीच कळी खुलली. केवळ तिचीच नाही तर तिच्या चाहत्यांचीदेखील कळी खुलली. 

एकंदर काय तर करणने एक ‘हिंट ’ दिलीय. आता त्याचे हे वाक्य कधी खरे होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागणार आहे. ‘कॉफी विद करण अ‍ॅण्ड करिना’ कधी पाहायला मिळते, आता केवळ याचीच प्रतीक्षा...!
 
 

Web Title: 'Coffee Withdrawal' But 'Coffee With Karan And Kareena'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.