'या' मेकअप मागे कोणत्या अभिनेत्रीचा चेहरा दडलाय पाहण्यासाठी क्लिक करा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 11:04 IST2017-09-19T05:03:17+5:302017-09-19T11:04:59+5:30

ही अभिनेत्री कोण आहे, तुम्ही ओळखलत का ? आम्ही तुम्हाला हे ऐवढेच सांगू इच्छितो कि हा सगळा प्रोस्थेटिक मेकअपचा ...

Click 'Back' to see which face of the actress's face. | 'या' मेकअप मागे कोणत्या अभिनेत्रीचा चेहरा दडलाय पाहण्यासाठी क्लिक करा..

'या' मेकअप मागे कोणत्या अभिनेत्रीचा चेहरा दडलाय पाहण्यासाठी क्लिक करा..

अभिनेत्री कोण आहे, तुम्ही ओळखलत का ? आम्ही तुम्हाला हे ऐवढेच सांगू इच्छितो कि हा सगळा प्रोस्थेटिक मेकअपचा कमाल आहे. ज्यानंतर तुमचा अवतार संपूर्णपणे बदलला जातो.  

चला आता आम्ही तुम्हाला सांगतो की हि अभिनेत्री कोण आहे ती. हि अभिनेत्री आहे तुमची फेव्हरेट सनी लिओनी. सनी आपल्या आगमी प्रोजेक्टसाठी प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेते आहे. हा मेकअप करायला कधी कधी चार ते पाच तास तर अगदी कधी बारा ताससुद्धा लागू शकतात. तेव्हा जाऊन हा मेकअप होतो. सनी लिओनीबद्दल बोलायचे झाले तर तिला नेहमीच काही तरी चॅलेजिंग करायला आवडते. तसेच ती आपल्या कामासाठी किती ही वेळ द्यायला तयार असते. त्यामुळे आज सनी अनेक निर्मांत्यांची फेव्हरेट बनली आहे.   

सनी आणखीन एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात तिचे डोळे संपूर्णपणे बंद आहेत. सनी नेमका प्रोस्थेटिक मेकअप कोणत्या प्रोजेक्टसाठी करते आहे त्याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. मात्र प्रोस्थेटिक मेकअपचा उपयोग रजनीकांत आणि अक्षय कुमारने 2.0 चित्रपटात केला आहे. या मेकअपचा उपयोग अमिताभ बच्चन यांनी सुद्धा आपल्या 'पा' चित्रपटातील भूमिकेसाठी केला होता. आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात याचा उपयोग करण्यात आला आहे.  

ALSO READ : सनी लिओनी मुलगी निशा अन् पती डेनियल वेबरसोबत झाली स्पॉट, पहा फोटो!

सनीने आपल्या करिअरची सुरुवात जिस्म 2 याचित्रपटातून केली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी सनीची ओळख पॉर्नस्टार म्हणून होती. ती बिग बॉस शो सीझन 5 मध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिच्यावर अनेक निर्मात्यांच्या नजरा गेल्या. बिग बॉस शो तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. रागिनी एमएमएस 2 मध्ये सुद्धा झळकली होती.  अनेक चित्रपटात सनीने आयटम साँगसुद्धा केले आहेत. सनीने शाहरुख खानच्या रईस चित्रपटात लैला मैं लैला गाणं चांगलेच हिट झाला होते. सनीने काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील निशा नावाची चिमुकली दत्तक घेतली आहे. सध्या सनी आणि डेनियल निशाच्या अप-ब्रिंगिंगवर विशेष लक्ष देऊन आहेत.
 

Web Title: Click 'Back' to see which face of the actress's face.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.