‘क्लासिकुल’ या अनोख्या कार्यक्रमात रंगणार शास्त्रीय फ्युजनची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 15:15 IST2017-12-22T09:45:56+5:302017-12-22T15:15:56+5:30

मुंबईतील संगीतरसिकांना ऊर्जाभारी सांगीतिक संध्याकाळ अनुभवण्याची एक अनोखी अशी संधी मिळणार आहे ती ‘क्लासिकुल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. गुरुवारी २८ ...

Classical Fusion Combination | ‘क्लासिकुल’ या अनोख्या कार्यक्रमात रंगणार शास्त्रीय फ्युजनची जुगलबंदी

‘क्लासिकुल’ या अनोख्या कार्यक्रमात रंगणार शास्त्रीय फ्युजनची जुगलबंदी

ंबईतील संगीतरसिकांना ऊर्जाभारी सांगीतिक संध्याकाळ अनुभवण्याची एक अनोखी अशी संधी मिळणार आहे ती ‘क्लासिकुल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. गुरुवारी २८ डिसेंबर २०१७ रोजी वरळी येथील नेहरू सेंटर येथे सायंकाळी हा कार्यक्रम होत आहे. चतुरस्त्र गायक जावेद अली आणि तौफिक कुरेशी (तंतुवाद्य) हे दिग्गज या कार्यक्रमात अत्यंत प्रतिभावान अशा पुर्बयान चॅटर्जी (सितार), ओजस अधिया (तबला), संगीत हल्दिपूर (किबोर्ड) आणि ऱ्हिदम शॉ (बास गीटार) यांच्याबरोबर रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाले आहेत.

‘क्लासिकल इज कुल’ ही एक चळवळ असून आपल्या देशात अत्यंत दर्जेदार असा कलाप्रकार असलेल्या शास्त्रीय संगीताचे पुनरुज्जीवन आणि नवनिर्मिती करण्याच्या दृष्टीने ती सुरु झाली आहे. अनंत काळापासून चालत आलेली परंपरा कायम राखण्यासाठी चतुरस्त्र गायक जावेद अली आणि सितारवर प्रतिभावान पुर्बयान चॅटर्जी एकत्र आविष्कार घडविणार आहेत. संगीत रसिकांसाठी ही एक सांगीतिक पर्वणी असणार आहे. त्याशिवाय त्यांच्याबरोबर काही उत्तम कलाकारही या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यातून अविस्मरणीय आणि याआधी कधीही अनुभवले गेले नाही असे काहीतरी रसिकांसमोर येणार आहे. त्यातून शास्त्रीय आणि फ्युजन यांचा एकत्रित अनुभव या कार्यक्रमात घेता येणार आहे.

चतुरस्त्र गायक जावेद अली म्हणतात, “क्लासिकुल’मध्ये गाण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. माझ्याबरोबर सहभागी होत असलेले हे देशातील आघाडीचा संगीतकार आहेत. मी शास्त्रीय संगीताची ही चळवळ माझ्या चित्रपट संगीताच्या कामाबरोबरच गेली कित्येक वर्षे चालवत आलो आहे. मी या प्रतिभावान कलाकारांना सुयश चिंतितो आणि शुभेच्छाही देतो.

प्रतिभावान सितारवादक पुर्बयान चॅटर्जी म्हणाले, “‘क्लासिकुल’ हा शास्त्रीय संगीतकारांसाठी एक अत्यंत महत्वाचा असा दिवस असणार आहे. आपले शास्त्रीय संगीत किती थोर आहे आणि आपल्या देशात प्रत्येक संगीत प्रकारामध्ये ते कसे सामावलेले आहे तसेच सर्वच संगीत प्रकारांमध्ये ते कसे मिसळून जाते, याचे प्रत्यंतर अशा कार्यक्रमांमधून येते.”

द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी ‘क्लासिकुल’चे आयोजन केले आहे. या संस्थांचे असे मानाने आहे की, शास्त्रीय सांगिताला एक दर्दी रसिकवर्ग असतो. त्याचबरोबर, अलीकडच्या ट्रेंडवरून असे दिसून आले आहे की, रसिकांना नव्या दमाच्या संगीत कलाकारांनाही ऐकायचे असते. म्हणूनच, अशाप्रकारचे यथायोग्य व्यासपीठ दिल्याचा आनंद आयोजक व्यक्त करतात.

Web Title: Classical Fusion Combination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.