वडील-मुलांच्या नात्याचे ‘सिनेमॅटिक’ रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 15:20 IST2016-12-03T15:19:45+5:302016-12-03T15:20:44+5:30

२०१६ हे वर्ष आता सरत आले आहे. या बारा महिन्यांच्या काळात अनेक नवनवीन विषयांवर आधारित सिनेमे तयार झाले. नव्या ...

'Cinematic' color of father-son relationship | वडील-मुलांच्या नात्याचे ‘सिनेमॅटिक’ रंग

वडील-मुलांच्या नात्याचे ‘सिनेमॅटिक’ रंग

१६ हे वर्ष आता सरत आले आहे. या बारा महिन्यांच्या काळात अनेक नवनवीन विषयांवर आधारित सिनेमे तयार झाले. नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी मोठ्या पडद्यावर हटके कथा साकारल्या. मग ते ‘नीरजा’सारखे बायोपिक्स असो किंवा ‘पिंक’सारखे डोळ्यात अंजन घालणारे सिनेमे, मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणाऱ्या कलाकृती या वर्षाचे आकर्षण ठरल्या.

‘वडिल-मुलांचे’ नाते उलगडून दाखवणारे चित्रपटसुद्धा २०१६चे वैशिष्ट्ये आहे. हिंदी फिल्म तशा कौटुंबिक आणि प्रेमकथेकडे झुकणाऱ्या असतात, पण वडिल आणि मुलामुलींच्या नात्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचे धाडस काही फिल्मसने केले. त्या काही निवडक हिंदी-इंग्रजी चित्रपटांचा घेतलेला हा आढावा...

१. दंगल : 



वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणाऱ्या या बहुप्रतीक्षित सिनेमाची खूप चर्चा आहे. आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटासारखेच याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात आमिर कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारत आहे.

भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवून देणाऱ्या गीता आणि बबिता फोगटचे ते वडील. महावीर आणि त्यांच्या मुलींची गोष्ट भारतीय पालक-पाल्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार यात काही शंका नाही.
२. फार्इंडिंग डोरी



‘फार्इंडिंग निमो’ या सुपरहीट अ‍ॅनिमेशनपटाचा सिक्वेल म्हणजे ‘फार्इंडिंग डोरी’. मोठ्या डोळ्यांच्या विसरभोळ्या डोरीला दर दहा सेंकदाला विसरुन जाण्याची सवय असते. पण तिला फक्त आपले आईवडिल आठवत असतात. मग सुरू होतो तिचा त्यांना शोधण्याचा प्रवास.

यामध्ये तिला साथ देतात तिचे दोन मित्र निमो आणि मार्लिन. महासागरातील दुनियेची रम्य सफर घडवणाऱ्या चित्रपटाने कित्येकांच्या डोळ्यात पाणी आणले. आईवडिलांना भेटण्याची डोरीची ओढ आणि धडपड पाहून कोणीही भावनाविवश होईल.
३. शिवाय



दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘शिवाय’मध्ये वडील-मुलीची हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात आली. अजय देवगन दिग्दर्शित या चित्रपटात ‘शिवाय’ (अजय) आपल्या आठ वर्षीय अपहृत मुलीची सुटका करण्यासाठी बल्गेरियात सर्व शक्ती पणाला लावतो.

मुलीसाठी एक बाप काय काय करू शकतो याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना येतो. आपल्या मुलांवर संकट आल्यावर कोणताच पिता शांत बसू शकत नाही. अजय आणि बालकलाकार अ‍ॅबिगेली एम्स यांनी खूपच सुंदर बाप-लेकीची जोडी उभी केली आहे.
४. कपूर अँड सन्स



प्रामुख्याने हा चित्रपट जरी संपूर्ण कुटुंबाविषयी असला तरी त्यामध्ये बाप-लेकाच्या नात्यावर जाणीवपूर्वक अधिक प्रकाश टाकण्यात आला आहे. सिनेमातील एका प्रसंगात फवाद खानला आपल्या वडिलांच्या अफेयरविषयी कळते आणि तो वडिलांना त्याचा जाब मागतो.

वडील-मुलाच्या नात्यातील आतापर्यंत कधीही न दाखवलेली बाजू या सीनमध्ये दिसते. कुटुंबातील नातेसंबंधावर जुना चष्म्याऐवजी एकदम नव्या नजरेने पाहण्याची कमाल ‘कपूर अँड सन्स’ने केली. 
५. पिकू



बाप-लेकीच्या नात्याविषयी बहुधा ही अलिकडच्या काळातील सर्वाेत्तम फिल्म आहे. दीपिका आणि अमिताभच्या नितांत सुंदर अभिनयाने नटलेल्या या सिनेमाने बाप-लेकीच्या नात्याची व्याख्याच बदलून टाकली.

सतत तक्रार करणाऱ्या वडिलांची मनापासून सेवा करण्याबरोबरच स्वत:चे स्वतंत्र अस्तित्त्व टिकवण्यासाठी झटणारी लेक दीपिकाने खूप छान पद्धतीने साकारली आहे. त्यात इरफान खान म्हणजे ‘सोन पे सुहागा’! दिल्ली ते कोलकाता रोड ट्रीपमध्ये रंगलेले नाट्य चित्रपट संपल्यावरही आपल्या स्मरणात राहते.

Web Title: 'Cinematic' color of father-son relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.