सिनेमा महिलांच्या प्रगतीला प्रतिबिंबित करतो : अमिताभ बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 20:30 IST2016-11-12T20:30:10+5:302016-11-12T20:30:10+5:30
महिलांनी भारतीय सिनेमाचे क्षितिज व्यापले असे असे मत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. देशातील महिलांचे अधिकार व ...

सिनेमा महिलांच्या प्रगतीला प्रतिबिंबित करतो : अमिताभ बच्चन
२२ व्या कोलकाता आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली. या महोत्सवाच्या उद््घाटनाप्रसंगी ते म्हणाले, जगभरातील संकुचित व घरगुती वातावरणात वाढलेल्या महिलांच्या परिवर्तनवादी चळवळीला पाच वेगवेगळ्या प्रतिमेतून पाहता येते. भारतीय सिनेमाच्या सुरुवातीपासूनच काही गोष्टी सिनेमाला आकर्षित करीत आहेत, यात महिलांमध्ये होणारे बदल, जगाशी व घरी असलेले त्यांचे संबंध, त्यांचे नात्यातील स्थान, शिक्षण क्षेत्रात असलेल्या महिला, राजकारणातील त्यांची जागा व यौनशोषणाचा मुद्दा हे प्रमुख आहेत.
या सर्व विषयावर बोलताना त्यांनी विविध चित्रपटांचे दाखले दिले, यात सत्यजित रेच्या ‘अछुत कन्या’, रित्विक घटक यांचा ‘मेघे ढाका तारा’, विशाल भारद्वाज यांच्या ‘हैदर’ या चित्रपटात तब्बूने साकारलेली गझला मीर, देव आनंदच्या ‘गाईड’ मधील रोसी, ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्याने साकारलेली सबा, ‘मदर इंडिया’मधील नर्गिसने साकारलेली राधा, केतन मेहताच्या ‘मिर्च मसाला’मधील सोम बाई, आलिया भट्टने ‘उडता पंजाब’ या चित्रपटात साकारलेली बिहारी मुलगी या चरित्रांचा उल्लेख केला.
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पिंक’ या चित्रपटाविषयी बोलताना अमिताभ म्हणाले, लैंगिक संबंधावर महिलांच्या सहमतीवर सिनेमातून चर्चा करण्यात आली नव्हती, ‘पिंक’च्या माध्यमातून ती घडून येत आहे. देशात यावर चर्चा केली जात असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाचा उल्लेख करीत आशिया कपमध्ये विजयी झालेल्या महिला हॉकी टीमचे कौतुक केले.
शुक्रवारपासून २२ व्या कोलकाता फिल्म फेस्टिव्हलला सुरूवात झाली असून, यात देशाच्या विविध भाषेतील चित्रपटांसह जगभरातील चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहे.