Christmas Party:​ ख्रिसमस पार्टीत पोहोचला तैमूर अली खान, मॉम -डॅडसोबत दिली झक्कास पोज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 17:08 IST2017-12-25T11:38:47+5:302017-12-25T17:08:47+5:30

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा लाडका मुलगा तैमूर अली खान याचा यंदाचा पहिला ख्रिसमस. दरवर्षीप्रमाणे यंदाही कपूर ...

Christmas Party: Christmas Party TIMUR ALI Khan, mom and dad go with pose! | Christmas Party:​ ख्रिसमस पार्टीत पोहोचला तैमूर अली खान, मॉम -डॅडसोबत दिली झक्कास पोज!

Christmas Party:​ ख्रिसमस पार्टीत पोहोचला तैमूर अली खान, मॉम -डॅडसोबत दिली झक्कास पोज!

फ अली खान आणि करिना कपूर यांचा लाडका मुलगा तैमूर अली खान याचा यंदाचा पहिला ख्रिसमस. दरवर्षीप्रमाणे यंदाही कपूर फॅमिलीत ख्रिसमसचे ग्रॅण्ड सेलिब्रेशन होणार म्हटल्यावर या पार्टीत तैमूर अली दिसतो की नाही, याची उत्सुकता अनेकांना लागली होती. या पार्टीतील तैमूरचा आणखी एक क्यूट फोटो पाहायलाही चाहते उत्सूक होते. चाहत्यांची ही उत्सुकता अखेर शमली कारण तैमूर या पार्टीत सामील झाला आणि विशेष म्हणजे, या पार्टीसाठी जात असतानाचे त्याचे फोटोही व्हायरल झालेत. आनंदाची गोष्ट म्हणजे, या फोटोत तैमूर पहिल्यांदा आपल्या पायावर उभा असलेला दिसला. मम्मा - पप्पाच्या मध्ये उभे होत तैमूरने कॅमेºयांना मस्तपैकी पोज दिली.



यावेळी करिना, सैफ आणि तैमूर असे तिघेही डेनिम लूकमध्ये दिसले. करिनाने यावेळी डेनिमचा शॉर्ट ड्रेस कॅरी केला होता तर सैफने डेनिम जीन्स आणि त्यावर डेनिम जॅकेट परिधान केले होते. तैमूरनेही डेनिम पॅन्ट घातला होता. यावेळी अख्खी फॅमिली पार्टी मूडमध्ये दिसली.



नुकताच तैमूरचा पहिला वाढदिवस साजरा झाला. पतौडी घराण्याच्या वडिलोपार्जित पतौडी पॅलेसमध्ये खान व कपूर कुटुंबीयांनी एकत्र येत लाडक्या तैमूरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. या बर्थ डे सेलिब्रेशनचे अनेक फोटो आपण पाहिले आहेतच. आता तैमूरच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो पाहा. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तैमूरच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत, हे आम्ही आत्ताच दाव्यानिशी सांगतो.



ALSO READ : WHAT??​ तैमूर अली खानला बर्थ डे गिफ्ट म्हणून मिळालं एक अख्ख जंगल!!

तैमूर अली खान कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सध्या ती आई करिना कपूर आणि पापा सैफ अली खान यांच्यापेक्षाही तैमूर अधिक चर्चेत असतो. तो दिसला रे दिसला की कॅमेरे त्याच्याकडे वळतात. त्याची एक झलक टीपण्यासाठी पापाराझींची झुंबड उडते. इतके कमी की काय म्हणून अलीकडे तैमूरच्या बॉलिवूड कॅमिओच्या अफवाही उडताहेत. पण खरे सांगायचे तर, प्रत्येक पालकांप्रमाणे तैमूरचे मम्मी-पापा यामुळे चिंतीत आहे. इतक्या लहान वयात तैमूरला इतकी प्रसिद्धी मिळतेय, हे पाहून करिना व सैफची चिंता वाढली आहे. या सगळ्या झगमगाटात  स्टारकिड्स म्हणून मोठा होताना तैमूरचे बालपण हिरावले जायला नको, असे करिना व सैफला वाटू लागले आहे. याचमुळे दोघांनीही  तैमूरला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी मध्यंतरी आली होती.

Web Title: Christmas Party: Christmas Party TIMUR ALI Khan, mom and dad go with pose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.