चिरंजिवीच्या घरात झाली दोन लाखांची चोरी; मात्र चोराने दिली १६ लाख चोरल्याची कबुली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 19:01 IST2017-11-09T13:31:34+5:302017-11-09T19:01:34+5:30

साउथ सुपरस्टार चिरंजिवी याच्या घरात काही दिवसांपूर्वीच दोन लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबतचा पोलिसांत गुन्हाही दाखल ...

Chiranjeevi's house stolen two lakhs; Thirty million thieves confessed by thief! | चिरंजिवीच्या घरात झाली दोन लाखांची चोरी; मात्र चोराने दिली १६ लाख चोरल्याची कबुली!

चिरंजिवीच्या घरात झाली दोन लाखांची चोरी; मात्र चोराने दिली १६ लाख चोरल्याची कबुली!

उथ सुपरस्टार चिरंजिवी याच्या घरात काही दिवसांपूर्वीच दोन लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबतचा पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी याप्रकरणाची गुत्थी सोडली असून, आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे चिरंजिवीचा नोकर चेन्नैया याला अटक केली आहे. परंतु धक्कादायक बाब तेव्हा समोर आली जेव्हा नोकराने मी दोन नव्हे तर गेल्या काही महिन्यात तब्बल १६ लाख रुपये चिरंजिवीच्या घरातून चोरल्याची कबुली दिली. 

चेन्नैया गेल्या दहा वर्षांपासून चिरंजिवीच्या घरी नोकर म्हणून काम करतो. सध्या चेन्नैयाचे वय २८ असून, तो गेल्या १८ वर्षांपासून चिरंजिवीच्या घरी काम करीत असल्याने तो सर्वाधिक विश्वासू नोकर समजला जातो. त्याचबरोबर चेन्नैयाला घरातील कुठली वस्तू कुठे ठेवली जाते याची इत्यंभूत माहिती असल्याने पैशाचा ठावठिकाणा तो जाणून होता. मात्र जुना आणि विश्वासू असल्याने त्याच्यावर कोणीही संशय घेत नव्हते. याचाच फायदा घेऊन चेन्नैया घरात हात साफ करू लागला. 



सुरुवातीला त्याने थोडी-थोडी रक्कम चोरण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्यावर कोणीही संशय घेतला नाही. परंतु जेव्हा त्याने तब्बल दोन लाख रुपये चोरले तेव्हा त्याच्यावर सर्वांचाच संशय गेला. पुढे हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. जेव्हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हाच पोलिसांचा चेन्नैयावर संशय गेला. त्याला तपासासाठी ताब्यात घेतले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दोन नव्हे तर सोळा लाख रुपये चोरल्याची कबुली दिली. आरोपी चेन्नैयाकडून चोरलेली रक्कम हस्तगत करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर केले आहे. 

Web Title: Chiranjeevi's house stolen two lakhs; Thirty million thieves confessed by thief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.