खळबळजनक! रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल छोटा शकीलचा खुलासा, म्हणाला- 'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा'  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:38 PM2020-08-28T13:38:41+5:302020-08-28T13:39:20+5:30

सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमला रिया चक्रवर्तीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत काही पुरावे हाती लागले असल्याचे बोलले जात आहे.

Chhota Shakeel's revelation about Riya's underworld connection, said- 'Our money in Bollywood', | खळबळजनक! रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल छोटा शकीलचा खुलासा, म्हणाला- 'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा'  

खळबळजनक! रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल छोटा शकीलचा खुलासा, म्हणाला- 'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा'  

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत असून या प्रकरणी दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यानंतर बॉलिवूडमधील काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि ड्रग्ज माफियांबरोबर लिंक असण्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. 

न्यूज 18 इंडियाच्या रिपोर्टनुसार, छोटा शकीलने एकीकडे रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे वृत्त फेटाळले आहे तर दुसरीकडे त्याने बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची पकड असल्याचे म्हटले आहे. छोटा शकीलने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आम्ही पैसे पुरवत असल्याचा खुलासा केला आहे.


सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमला रिया चक्रवर्तीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत काही पुरावे हाती लागले असल्याचे बोलले जात आहे. सुशांत मृत्यू प्रकरणात अंडरवर्ल्डच्या एंट्रीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. न्यूज 18 इंडियाला दिलेल्या मुलाखतीत छोटा डॉन शकीलने असे म्हटले आहे की, सीबीआय त्यांचा तपास करत आहे. याप्रकरणी सीबीआयने अनेकांची चौकशी केली आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल.

छोटा शकीलने याप्रकरणी गौरव आर्याशी ओळख असण्यासही नकार दिला आहे. छोटा शकीलच्या मते त्याने हे नाव पहिल्यांदा ऐकले आहे. छोटा शकीलने असे म्हटले आहे की, ही सर्व कहाणी रचण्यात आली आहे की गौरवचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. आमचे गौरवशी काही घेणेदेणे नाही आहे. आम्ही रिया चक्रवर्तीला देखील ओळखत नाही. आमचे तिच्याशी काही कनेक्शन नाही.


छोटा शकील म्हणाला की, बॉलिवूडमध्ये काहीही झाले तरी त्यामध्ये अंडरवर्ल्डचे नाव जोडले जाते. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे आणि लवकरच संपूर्ण सत्य सर्वांसमोर येईल. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि बाकी एजन्सी काय करत आहेत. जे कुणी लोक अंडरवर्ल्डबरोबर रियाचे कनेक्शन असल्याच्या गोष्टी करत आहेत, ते तद्दन खोटे बोलत आहेत. जे कुणी असा दावा करत आहे त्याने स्वत:च्या मुलांची शपथ घेऊन बोलावे की रियाशी आमचे कनेक्शन आहे. सीबीआय चौकशी आधी एखाद्याला शिक्षा सुनावणे चुकीचे आहे.
छोटा शकील म्हणाला की, आज देखील बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची पकड आहे. आम्ही बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवणाऱ्यांना आजही पैसे पुरवतो.

Web Title: Chhota Shakeel's revelation about Riya's underworld connection, said- 'Our money in Bollywood',

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.