छोटा राजनचे बॉलिवूड कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:27 IST2016-01-16T01:16:18+5:302016-02-06T13:27:09+5:30

इंडोनेशियातील बाली येथे अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि त्याच्या बॉलिवूड कनेक्शनचा इतिहास मोठा आहे. ९0 च्या ...

Chhota Rajan's Bollywood connection | छोटा राजनचे बॉलिवूड कनेक्शन

छोटा राजनचे बॉलिवूड कनेक्शन

डोनेशियातील बाली येथे अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि त्याच्या बॉलिवूड कनेक्शनचा इतिहास मोठा आहे. ९0 च्या दशकात जेव्हा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डची लिंक समोर आली तेव्हा दाऊदच्या डी कंपनीचे नाव जगाला कळले. याच काळात संजय दत्तचे डी कंपनीसोबत कनेक्शन आणि नंतर मुंबई बॉम्बस्फोटातील सहभागाचे प्रकरणही समोर आले.

९0 च्या दशकात जेव्हा डी कंपनीने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला त्यावेळी छोटा राजन डी कंपनीच्या गँगचा हिस्सा होता आणि त्याच्याकडे दाऊदने दुसरी जबाबदारी दिली होती. परंतु बॉम्बस्फोटानंतर दाऊदशी छोटा राजनचे संबंध संपुष्टात आले. या संधीचा फायदा घेत छोटा राजनच्या गँगनेदेखील बॉलिवूडमध्ये पाय पसरायला सुरुवात केली. असे म्हटले जात आहे की, छोटा राजनने संजय दत्तलाच आपली पहिली शिकार केले. महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव चित्रपटाची कथादेखील छोटा राजनच्या जीवनावर दाखविली गेली तर या चित्रपटाशी राजनचा भाऊ दीपक निखंज निर्माता म्हणून जुडला होता. याही पूर्वी संजय दत्तने बागी नावाच्या चित्रपटात काम केले होते, ज्यात संजय दत्त सोबत मनीषाची जोडी होती. या चित्रपटाचे निर्माता रमेश शर्मा, ज्यांना सर्वजण गूंगा नावाने ओळखतात. त्याला छोटा राजनचा माणूस समजले जात होते.

रमेश शर्माने यापूर्वी नसीरुद्दीन शाह आणि आदित्य पांचोली सोबत गेम नावाचा चित्रपट केला होता आणि या चित्रपटाच्या प्रीमियर शोलाच पोलिसांनी रमेश शर्माला अटक केली होती. त्यावेळी अशी चर्चा होती की, दाऊदच्या गँगशी संबंध असलेल्या बॉलिवूडच्या अनेक स्टारमंडळींना छोटा राजनने टार्गेट केले आणि विशेषत: संजय दत्तचे नाव समोर आल्यावर संजय दत्तला राजनकडून मारण्याची धमकीदेखील दिली गेली होती. असे सांगितले जाते की, एका डीलनुसारच संजय दत्तने पहिले बागी चित्रपटात आणि नंतर वास्तवमध्ये काम केले.


असे म्हटले जाते की, रामगोपाल वर्माने जेव्हा कंपनी चित्रपट बनविला तेव्हा त्यामध्ये विवेक ओबेरॉयच्या भूमिकेला राजनशी कनेक्ट दाखविले होते. यावेळी राजनने रामूलादेखील सोडले नाही आणि अशी तंबी दिली की त्याच्या कॅरेक्टरला न्याय मिळाला नाही, तर परिणाम चांगले होणार नाही. असेही म्हटले जाते की राजनच्या हिरव्या झेंडीनंतर रामूच्या कंपनीच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. जानकार मानतात की, राजनचा बॉलिवूडवर कधी तशा प्रकारचा दबदबा राहिला नाही, जसा दाऊदचा राहिला. दाऊदला तोड देण्यासाठी राजन बॉलिवूडकडे वळला, मात्र जास्तकाळ तो टिकला नाही. ९0 चे दशक पूर्ण होता होता बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा दवाब कमी होत गेला. तिकडे छोटा राजनदेखील मुंबईत आपल्या दुसर्‍या व्यवसायांकडे वळला.

Web Title: Chhota Rajan's Bollywood connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.