३० वर्षानंतर असं घडलं! छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दिली मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 02:43 PM2024-05-24T14:43:43+5:302024-05-24T14:44:13+5:30

कान्स महोत्सवात छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांकडून तब्बल ८ मिनिटं उभं राहून मानवंदना दिली. पाहा हा अभिमानास्पद व्हिडीओ (chhaya kadam)

chhaya kadam All We Imagine As Light movie in 30 years got longest standing ovations in cannes film festival | ३० वर्षानंतर असं घडलं! छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दिली मानवंदना

३० वर्षानंतर असं घडलं! छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दिली मानवंदना

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री. छाया कदम यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय. छाया यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' मध्ये काम केलं. शिवाय आमिर खानच्या प्रॉडक्शनच्या 'लापता लेडीज' सिनेमात छाया यांनी साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. छाया यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सर्व चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केलीय. सध्या सुरु असलेल्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांनी उभं राहून मानवंदना दिलीय.

छाया कदम यांच्या सिनेमाने कान्स गाजवला

पिंकविलाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत बघायला मिळतं की.. छाया कदम यांचा ‘All We Imagine As Light’ या सिनेमाचा कान्स महोत्सवात प्रिमियर झाला. यावेळी सिनेमा संपल्यावर उपस्थित परदेशी प्रेक्षकांनी आणि थिएटरमधील सर्वांनी या सिनेमासाठी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. याक्षणी कॅमेरा जेव्हा छाया कदम यांच्यावर आला तेव्हा त्या या कौतुकाने भारावलेल्या दिसल्या. त्यांनी सर्वांना फ्लाईंग किस देऊन प्रेम दर्शवलं. विशेष म्हणजे ३० वर्षांनंतर एखादा भारतीय सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या स्पर्धेत शर्यतीत आहे.

छाया कदम यांची कान्सवारी

‘All We Imagine As Light’ या सिनेमासाठी छाया कदम पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेल्या होत्या. यावेळी त्यांना आईची खूप आठवण आली. त्यांच्या ‘All We Imagine As Light’ या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय. पायल कपाडिया यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. कनी कुसरुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: chhaya kadam All We Imagine As Light movie in 30 years got longest standing ovations in cannes film festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.