करणी सेनेचा आरोप; अंडरवर्ल्डच्या दबावामुळेच सेन्सॉरने ‘पद्मावती’ला दाखविला हिरवा कंदील !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 14:30 IST2017-12-31T08:59:37+5:302017-12-31T14:30:59+5:30
गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट सातत्याने वादाच्या भोवºयात सापडत आहे. त्यामुळे तब्बल ...

करणी सेनेचा आरोप; अंडरवर्ल्डच्या दबावामुळेच सेन्सॉरने ‘पद्मावती’ला दाखविला हिरवा कंदील !
ग ल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट सातत्याने वादाच्या भोवºयात सापडत आहे. त्यामुळे तब्बल दोनदा सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. मात्र आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला यू/ए सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतला असताना करणी सेनेने विरोधाची धार आणखी तीव्र केल्याचे दिसून येत आहे. काल सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीन्सला कात्री लावत ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ असे ठेवल्यास चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास अनुकूल असल्याचे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनीदेखील सेन्सॉरच्या या निर्णयाशी समंत असल्याचे म्हटले होते. परंतु राजपूत करणी सेनेने सेन्सॉर बोर्डावरच आरोपांची बरसात करीत बोर्ड निर्मात्यांच्या बाजूने निर्णय घेत असल्याचे म्हटले होते. आता तर करणी सेनेने हा आरोप लावला की, अंडरवर्ल्डच्या दबावामुळेच सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ला हिरवा कंदील दाखविला आहे. तसेच चित्रपट रिलीज झाल्यास, चित्रपटगृहांची तोडफोड करणार असल्याची धमकीही दिली आहे.
करणी सेनेचे सुखदेव सिंग गोगामेदी यांनी म्हटले की, ‘ज्या चित्रपटगृहात ‘पद्मावती’ प्रदर्शित केला जाईल, त्या चित्रपटगृहाची पूर्णत: तोडफोड केली जाईल. चित्रपटाच्या समीक्षणासाठी एक स्वत: कमिटी गठित करण्यात आली होती. या कमिटीने अखेरपर्यंत चित्रपटाला विरोध केला. अशातही सेन्सॉर बोर्डाने अंडरवर्ल्डच्या दबावात येत त्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे, तर राजपूत सभेचे अध्यक्ष गिराज सिंग लोटवाडा यांनी म्हटले की, सेन्सॉर बोर्डाने कमिटीच्या शिफारशीला फारसा थारा न देता निर्मात्यांची मदत करण्याचे ठरविले आहे. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने चित्रपटाला यापुढे विरोध करीत राहणार आहोत.
ALSO READ : ‘पद्मावती’ला करणी सेनेचा विरोधाचा सूर कायम; सेन्सॉर बोर्डाला दिला ‘हा’ सल्ला!!
या सर्व वादावर बोलण्यासाठी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी आयएनएनएस समाचार एजन्सीशी चर्चा केली. त्यांनी म्हटले की, सीबीएफसीने चित्रपटातील कोणत्याही सीनला कात्री लावण्यावरून शिफारस केली नाही. केवळ पाच संशोधन करण्यास सांगितले आहे.’ पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, ‘आम्ही निर्मात्यांना डिस्क्लेमर बदलण्यास सांगितले आहे. आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात हे सांगण्याचा प्रयत्न केला की, हा चित्रपट ऐतिहासिकदृष्ट्या योग्य असल्याचा दावा करणे चुकीचे आहे. बोर्डाने याव्यतिरिक्त निर्मात्यांना ‘घूमर’ गाण्यात बदल करण्याचे सुचविले आहे.