चॅलेंज! फोटोत दिसणार हा क्युट चिमुकला आज बॉलिवूडवर गाजवतोय अधिराज्य, कोण आहे हा अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 16:16 IST2022-11-22T16:15:53+5:302022-11-22T16:16:44+5:30

आज हा अभिनेता बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.

Challenge! This cute little boy seen in the photo is ruling Bollywood today, who is this actor? | चॅलेंज! फोटोत दिसणार हा क्युट चिमुकला आज बॉलिवूडवर गाजवतोय अधिराज्य, कोण आहे हा अभिनेता?

चॅलेंज! फोटोत दिसणार हा क्युट चिमुकला आज बॉलिवूडवर गाजवतोय अधिराज्य, कोण आहे हा अभिनेता?

आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल चाहत्यांना सर्वकाही जाणून घ्यायचे असते. लोक आपल्या आवडत्या कलाकाराच्या बालपणीचे फोटो, लूक आणि बालपणीचे किस्से ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात. फोटोत दिसणारा हा चिमुरडा आज बॉलिवूडची शान आहे. या मुलाने बरेच हिट सिनेमे दिले आहेत आणि हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. कुणी त्याला बादशाह म्हणतं तर कुणी किंग खान. 

फोटोतल्या या चिमुरड्याला ओळखलंत ना..हा दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) आहे. शाहरुख खानच्या बालपणीचा हा फोटो आहे. त्याने एक दशकभर चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले आणि आजही चाहत्यांमध्ये तीच क्रेझ पाहायला मिळते. शाहरुख खान लहानपणी खूप गोंडस दिसायचा. शाहरुख खान लहानपणी त्याचा लहान मुलगा अबरामसारखा दिसायचा.  शाहरुखला बॉलिवूडचा किंग खान, किंग खान किंवा किंग ऑफ रोमान्स म्हटले जाते. शाहरुखची फॅन फॉलोइंग जगभरात आहे.

दिल्लीत जन्मलेल्या शाहरुख खानच्या वडिलांचे नाव मीर ताज मोहम्मद खान आणि आईचे नाव लतीफ फातमा आहे. किंग खानचे वडील पाकिस्तानातील पेशावरहून दिल्लीत आले होते. हंसराज कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर शाहरुख खानने थिएटरमध्ये काम केले.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याने दिल दरिया, फौजी आणि सर्कस सारख्या शोमध्ये काम केले. नंतर त्याला चित्रपटांच्या ऑफर आल्या आणि अनेक उत्तम चित्रपट केले. त्याचे लग्न गौरी खानशी झाले आहे. त्यांना सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम अशी तीन मुले आहेत. त्यांची मुलगी सुहाना खान लवकरच चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.

Web Title: Challenge! This cute little boy seen in the photo is ruling Bollywood today, who is this actor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.