‘ग्लॅमर’साठी ‘या’ सेलिब्रिटींनी सोडले त्यांचे ‘आडनाव’ही !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 12:04 IST2017-06-01T06:34:28+5:302017-06-01T12:04:28+5:30
अबोली कुलकर्णी पैसा, ग्लॅमर, नाव, झगमगाट म्हणजे चंदेरी दुनिया. पडद्यावर आपण ज्या कलाकारांना पाहतो ते मोठ्या मेहनतीने, जिद्दीने ती ...
.jpg)
‘ग्लॅमर’साठी ‘या’ सेलिब्रिटींनी सोडले त्यांचे ‘आडनाव’ही !
पैसा, ग्लॅमर, नाव, झगमगाट म्हणजे चंदेरी दुनिया. पडद्यावर आपण ज्या कलाकारांना पाहतो ते मोठ्या मेहनतीने, जिद्दीने ती ‘उंची’ गाठत असतात. अर्थात कुठल्याही यशाच्या मागे त्याग, समर्पण असल्याशिवाय आपल्याला ते साध्य करता येत नाही. त्यांची ही धडपड, जिद्द असते केवळ नाव, पैसा कमावण्यासाठीच. चाहत्यांच्या ओठी सदैव आपलं नाव असावं असं त्यांना वाटत असतं. पण, तुम्हाला माहितीये का? ‘बी टाऊन’ मध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी ‘याच’ ग्लॅमरसाठी स्वत:च्या आडनावाचाही त्याग केला. मग त्या मागे कारण कोणतेही असो...पाहूयात, कोण आहेत हे स्टार्स ज्यांनी त्यांच्या ‘बॉलिवूड इमेज’ साठी त्यांचे आडनाव लावणे सोडले...
* धर्मेंद्र
‘पंजाबचा जट’ म्हणून धर्मेंद्रकडे पाहिले जाते. ८०च्या दशकांतील त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले. मात्र, त्यांना बॉलिवूडमध्ये केवळ धर्मेंद्र एवढ्याच नावाने पसंत केले जाऊ लागले. पुढे त्यांची मुले सनी आणि बॉबी तसेच मुली ईशा आणि अहाना यांनी देखील देओल हे नाव लावले. मात्र, धर्मेंद्र यांना आजही आपण त्यांच्या पहिल्या नावानेच ओळखतो.
* श्रीदेवी
भारतीय सिनेसृष्टीतील ‘पहिली सुपरस्टार’ म्हणून श्रीदेवीला ओळखले जाते. अनेक चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या नटखट आणि गोंडस भूमिका कायम स्मरणात राहण्यासारख्या आहेत. तिचे खरे नाव श्री अम्मा यंगर अय्यपन असे आहे. तिच्या वडिलांचे नावही बऱ्याच ठिकाणी ‘अय्यपन’ तर आईचे ‘राजेश्वरी’ असेच असल्याचे आढळून आले आहे. तरीही ती केवळ ‘श्रीदेवी’ एवढेच नाव लावते.
* रणवीर सिंग
‘बेफिक्रे’ हिरो रणवीर सिंग याचे बॉलिवूडमध्ये येण्याअगोदरचे नाव ‘रणवीर भवनानी’ असे होते. त्याला वाटले त्याचे हे नाव बॉलिवूडमधील इमेजसाठी खुप मोठे होत आहे. त्यामुळे त्याने सिंग हे आडनाव लावले. सिंग आडनावामुळे कदाचित त्याचे नाव हे यशाच्या शिखरावर जाईल असे त्याला वाटले.
* गोविंदा
बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा याने आता राजकारणातही त्याचे पाऊल ठेवले आहे. ‘चीची’ आणि ‘विरार का छोकरा’ अशा नावांनी त्याला साधारणपणे ओळखले जाते. मात्र, कधीही त्याला ‘गोविंदा अरूण अहूजा’ या नावाने ओळखले गेले नाही. त्यामुळे नंतर त्याने त्याचे आडनाव सोडले.
* हेलेन
८० च्या दशकांतील डान्सिंग सेन्सेशन म्हणजे हेलेन. त्या सलमान, अरबाज आणि सोहेल खान यांच्या दुसरी आई म्हणून ओळखल्या जातात. हेलेनचे खरे नाव हेलेन जैराग रिचर्डसन असे आहे. पण, त्यांना या नावाने कुणीही ओळखत नाही.
* काजोल
बॉलिवूडची सेनोरिटा म्हणजे काजोल. तिच्या मुखर्जी कुटुंबियांमध्ये आई तनुजा आणि त्यांच्या मुली काजोल, तनिषा बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. तिच्या आई-वडिलांमध्ये जेव्हापासून वाद सुरू झाले तेव्हापासून काजोलने तिच्या नावापुढे आडनाव लावणे बंद केले.
* रेखा
रेखा या ज्येष्ठ अभिनेत्री असूनही अजून त्या विविध चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. त्यांचा अभिनय, सौंदर्य सध्याच्या अभिनेत्रींना लाजवेल असाच वाटतो. त्यांचे खरे नाव ‘भानुरेखा गणेशन’ असे होते. तमिळ सुपरस्टार जेमिनी गणेशन आणि तेलुगू अभिनेत्री पुष्पावल्ली या त्यांच्या आईवडिलांनी हे तिचे नाव ठेवले होते. मात्र, रेखा यांना एक हॉट नाव त्यांच्यासाठी हवे होते. म्हणून त्यांनी मग स्वत:ला रेखा म्हणून ओळख निर्माण केली.
* तब्बू
विविधांगी भूमिका आणि उत्तम अभिनय साकारणारी अभिनेत्री म्हणून तब्बू यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे खरे नाव ‘तब्बसूम हाश्मी’ असे आहे. मात्र, त्यांना ‘शॉर्ट बट स्वीट’ असे नाव हवे असल्याने मग त्यांनी केवळ ‘तब्बू’ याच नावाचा स्वीकार केला.