रोमॅण्टिक सॉँग संगे करा ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 12:36 IST2017-02-07T07:06:10+5:302017-02-07T12:36:10+5:30
तुमचा रोमॅण्टिक अंदाजात प्रेम व्यक्त करण्याचा विचार असेल तर हे गाणे तुम्हाला मदतशीर ठरू शकतात. या गाण्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाइनसोबत एक अविस्मरणीय आठवण ठेवू शकता.
(29).jpg)
रोमॅण्टिक सॉँग संगे करा ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा
चांद ने कुछ कहा...
बॉलिवूडचा रोमॅण्टिक किंग शाहरूख खान याचे बरेचसे असे गाणे आहेत, जे व्हॅलेटाइन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाइनसोबत ऐकू शकता. त्यातीलच एक प्रभावी गाणं म्हणजे ‘चांद ने कुछ कहा’ हे होय. ‘दिल तो पागल है’ या सिनेमातील अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याबरोबरचे हे गीत प्रेम व्यक्त करण्यासाठीचे उत्तम माध्यम आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधून तुम्ही हे गीत गाऊन अथवा ऐकून तुमचा ‘व्हॅलेंटाइन डे’ अधिक स्पेशल करू शकता.
बाहों के दरमियां...
सलमान खान आणि मनीषा कोईराला यांच्या ‘खामोशी’ या सिनेमातील ‘बाहोंं के दरमियां’ या गीत मनाला स्पर्श करून जाते. ‘खामोशी’ असे नाव असलेल्या या सिनेमातील या गाण्याचे बोल म्हणजे काही न बोलताच प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. या गाण्यातील बोल कानावर पडताच तुम्हाला रोमॅण्टिकनेसचा अनुभव आला नाही तरच नवल. त्यामुळे हे गीतदेखील ‘व्हॅलेंटाइन डे’साठी एक चांगले माध्यम ठरू शकेल.
चुरा लिया हैं तुमने...
‘जुनं ते सोनं’ असते असं म्हणतात. झीनत अमानच्या ‘यादो की बारात’ या सिनेमातील ‘चुरा लिया हैं तुमने’ या गाण्यावरून तरी या म्हणीचा अर्थ स्पष्ट होतो. कारण आजही हे गीत मनाला स्पर्श करून जाते. कारण गाण्यातील शब्द कानावर पडताच एक वेगळ्याच दुनियेत आपण हरवून जातो. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेसाठी हे गाणे प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम ठरू शकते. हे गीत तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाइनबरोबर ऐकून चांगल्या आठवणींचा ठेवा करू शकता.
दो दिल मिल रहे है...
व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधून जर तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाइनला प्रपोज करू इच्छित असाल तर त्यासाठी हे गाणं उत्तम ठरू शकते. ‘परदेश’ या सिनेमातील हे गीत प्रेम व्यक्त करण्यासाठी समजले जाते. शाहरूख खान आणि महिमा चौधरी यांच्यातील चित्रित केलेल्या या गाण्याचे बोल मनाला स्पर्श करून जातात. त्यामुळे या व्हॅलेंटाइनला हे गाणे तुम्हाला तुमच्या प्रियसीला प्रपोज करण्यासाठी उत्तम ठरू शकते.
दिल तो पागल...
रोमॅण्टिक सिनेमा ‘दिल तो पागल हैं’चे हे टायटल सॉँग तुमचा हा ‘व्हॅलेंटाइन डे’ अधिक स्मरणीय करू शकेल. शाहरूख, माधुरी आणि करिष्मा यांच्यावर चित्रित केले गेलेले हे गाणं त्यावेळी तरुणाईला खूपच भावले होते. सिनेमाप्रमाणेच टायटल सॉँगही जबरदस्त हिट झाले होते. आजही या गाण्याचे बोल कानावर पडताच मनाला सुखद धक्का बसतो. त्यामुळे येत्या व्हॅलेंटाइनला हे गाणं तुमच्या व्हॅलेंटाइनबरोबर एक चांगली आठवण ठरू शकते.