सहकाऱ्यांसोबत कॅटची बाँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 12:24 IST2016-11-11T12:24:46+5:302016-11-11T12:24:46+5:30

व्यक्तीने नेहमी विनम्र असावे, असे म्हणतात. परंतु तुम्ही जेव्हा बॉलीवूड सुपरस्टार असता तेव्हा हा विनयशीलतेचा गुण अंगीकारणे थोडे जड ...

Cat bunding with colleagues | सहकाऱ्यांसोबत कॅटची बाँडिंग

सहकाऱ्यांसोबत कॅटची बाँडिंग

यक्तीने नेहमी विनम्र असावे, असे म्हणतात. परंतु तुम्ही जेव्हा बॉलीवूड सुपरस्टार असता तेव्हा हा विनयशीलतेचा गुण अंगीकारणे थोडे जड जाते. मात्र कॅटरिना कैफला असे वाटत नाही . कॅटच्या स्टेटसची अभिनेत्री किती नखरे, डिमांड्स करत असेल, स्टार-अ‍ॅटिट्यूड तर ठासून भरलेला असेल तिच्यामध्ये, अशी समजुत बाळगणे स्वाभाविक आहे.

परंतु कॅट तशी नाही. शूटींगच्या वेळी ती सर्व सहकऱ्यांसोबत अत्यंत प्रेमाने आणि अदबीने वागते. एवढेच नाही तर ब्रेक दरम्यान ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाण्याऐवजी अनेकवेळा क्रु मेंबर्ससोबत गप्पा मारते. तिच्या अशा या मनमोकळ्या स्वभावामुळे सेटवरील सर्व सहाकरी तिचे कौतुक करत असतात.

नुकतेच तिने ‘जग्गा जासूस’च्या सर्व असिस्टंट दिग्दर्शकांबरोबर एका फोढो काढला. तिच्या एका फॅन क्लबने तो फोटो ट्विटरवर शेअर केला असता नेटिझन्समध्ये तो चांगलाच व्हायरल झाला. चाहत्यांनी कॅटच्या अशा ‘डाऊन टू द अर्थ’ स्वभवाची स्तुती करत सगळीकडे हा फोटो शेअर केला. 

                                

अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘जग्गा जासूस’ची शूटींग आता अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी तो प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूर असून अनुराग बसू दिग्दर्शक आहे. अनेक व्यत्ययानंतर हा चित्रपटा पूर्णत्वास जात आहे. मध्यंतरी रणबीर-कॅटच्या ब्रेकअपमुळेसुद्धा सिनेमाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

‘बर्फी’नंतर अनुराग बसू आणि रणबीरची जोडी पुन्हा एकत्र येणार म्हणून चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता होती. परंतु सततच्या विलंबामुळे हा चित्रपट काहीसा मागे पडला आहे. कॅटलासुद्धा या फिल्मकडून खूप अपेक्षा आहेत. कारण यावर्षी तिचे दोन्ही चित्रपट - ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ - बॉक्स आॅफिसवर सपाटून आपटले.

बघुया ‘जग्गा जासूस’मुळे तिच्या करिअरमधील बॅड पॅच संपतो की नाही.

Web Title: Cat bunding with colleagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.