​casting couch: -अन् सेटवरून रडत रडत बाहेर पडली कन्न अभिनेत्री श्रुती हरिहरन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 14:06 IST2018-01-19T08:36:03+5:302018-01-19T14:06:03+5:30

श्रुती हरिहरन कन्नड चित्रपटांची नावाजलेली अभिनेत्री आहे. हीच कन्नड अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे. ती कशामुळे तर कास्टिंग काऊचबद्दलच्या ...

Casting couch: -Anna actress Shruti Hariharan came out crying from the set! | ​casting couch: -अन् सेटवरून रडत रडत बाहेर पडली कन्न अभिनेत्री श्रुती हरिहरन!

​casting couch: -अन् सेटवरून रडत रडत बाहेर पडली कन्न अभिनेत्री श्रुती हरिहरन!

रुती हरिहरन कन्नड चित्रपटांची नावाजलेली अभिनेत्री आहे. हीच कन्नड अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे. ती कशामुळे तर कास्टिंग काऊचबद्दलच्या तिच्या अनुभवामुळे. एका कार्यक्रमात बोलताना श्रुतीने कास्टिंग काऊचबदद्लचे तिचे अनुभव शेअर केलेत. पहिल्या चित्रपटाचा काहीसा भयानक अनुभव तिने शेअर केला. यामुळेच तिला तिचा पहिला चित्रपट सोडावा लागला.
   पहिल्या चित्रपटाची आॅफर आली तेव्हा मी केवळ १८ वर्षांची होते. मी कोरिओग्राफरकडे गेले आणि मला  सांगितले गेले ते सगळे मी करणार नाही, असे त्याला थेटपणे सांगून टाकले. माझा तो टोन कदाचित कोरिओग्राफरला खटकला. हे सगळे हँडल करू शकत नसतील तर चालती हो, असे म्हणून त्याने मला सेटवरून अक्षरश: हाकलून लावले. अश्रूंनी डबडबलेले डोळे घेऊन त्या दिवशी मी सेटवरून बाहेर पडले. पुढे मला हा चित्रपटचं सोडावा लागला, असे श्रुतीने सांगितले.
कास्टिंग काऊचबद्दल ती खुलेपणाने बोलली. एक तामिळ दिग्दर्शक माझ्याच कन्नड चित्रपटाचा रिमेक बनवू इच्छित होता. त्याने त्यासाठी मलाच साईन केले. पण यानंतर टेलिफोनवर बोलताना त्याने माझ्यासमोर जी अट ठेवली ती ऐकून मला धक्काच बसला. या चित्रपटाला पाच निर्माते आहेत आणि ते तुला वाट्टेल तसे वापरू शकतात, असा तो दिग्दर्शक मला म्हणाला. साहजिकच त्याची ती अट मानण्यासारखी नव्हती. मी त्याचक्षणाला नाही म्हटले आणि त्याचा तो चित्रपटही सोडला. फिल्मी दुनियेत कास्टिंग काऊच नवे नाही. अशास्थितीत मुलींना ‘नाही’ म्हणण्याची गरज नाही. कास्टिंग काऊचने पहिली संधी मिळू शकते पण या आधारावर संपूर्ण करिअर बनवता येणार नाही. शांत बसणे हा या समस्येवरचा उपाय नाही. अनेक चित्रपटांत केवळ कमोडिटी म्हणून हिरोईनला शूट केले जाते. जेणेकरून ती सुंदर, सेक्सी दिसावी आणि चित्रपट चालावा. पण हे कुठेतरी थांबणे आवश्यक आहे आणि मुली ठरवत नाही, तोपर्यंत हे थांबणार ेनाही, असेही ती म्हणाली.

Web Title: Casting couch: -Anna actress Shruti Hariharan came out crying from the set!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.